मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कृषी सहाय्यकास बक्षीस आ.अभिमन्यु पवार
औसा प्रतिनिधी
मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत मागच्या 13 दिवसात औसा तालुक्यातील 104 गावांना आमदार अभिमन्यु पवार यांनी भेटी देऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. या संवाद यात्रेनंतर दि.7 जून 2021 सोमवार रोजी औसा प्रशासकीय इमारत येथे आढावा बैठक घेतली. गावोगावी दिलेल्या भेटीत शेतकरी बांधवांनी मांडलेल्या अडचणीवर आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
औसा विधानसभा मतदार संघात बांधावर, सलग, पडीक, गायरान, व गावरान अशा 1500 हेक्टर जमिनीवर केशर आंबा लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यावर्षी औसा तालुक्यात किमान 2000 हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड करायची असून त्यासाठी सर्वांनी झोकून देऊन काम करावे.
वृक्ष लागवड, जनावरांसाठी गोठा, शेततळे, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प आणि लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी गाव निहाय कॅप आयोजित करून शेतकऱ्यांचे अर्ज संकलित करा. शेतकऱ्यांना आंबा लागवडीतून होणारे फायदे सांगा. शेत रस्ते निर्मितीच्या औसा पॅटर्नप्रमाणे केशर आंबा व चिंच लागवडीचा औसा पॅटर्न विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर काम करा अशा सूचना दिल्या. मनरेगातून ग्राम समृद्धी अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कृषी सहाय्यक यांना प्रथम क्रमांकाचे 25000 रुपये,तर द्वितीय क्रमांकाचे 11000 रुपये बक्षीस आमदार पवार यांच्या वैयक्तिक खिशातून देण्याची घोषणा केली. तसेच यावेळी अत्यंत कमी कालावधीत 200 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे प्रस्ताव सादर करणारे मासुरडी येथील कृषी सहाय्यक श्री भोसले यांचा सत्कार करुन अभिनंदन केले.
कृषी विभागाच्या बैठकीत आमदार पवार यांनी ही घोषणा केली असून या बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, गट विकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.