दिव्यांग कल्याण निधीसाठी औशात दिव्यांगाचे उपोषण

 दिव्यांग कल्याण निधीसाठी औशात दिव्यांगाचे उपोषण






औसा प्रतिनिधी 

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण निधीसाठी पाच टक्के राखीव निधी वितरित करण्याचे शासनाचे धोरण आहे .औसा तालुक्यातील 109 पैकी केवळ चार ग्रामपंचायतीने दिव्यांग कल्याण निधीचे वितरण केले. परंतु उर्वरित 105 ग्रामपंचायतीच्या अंतर्गत पात्र दिव्यांगांना 5  टक्के राखीव दिव्यांग कल्याण निधीचे वितरण करावे या मागणीसाठी अपंग जनता दल या संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक 7  जून रोजी औसा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले .याबाबत जिल्हाधिकारी लातूर तहसीलदार औसा यांनाही संघटनेने विनंती केली होती. गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ हे दिव्यांग कल्याण निधीचे वितरण करण्यास टाळाटाळ करीत असल्याने अपंग जनता दल संघटनेच्या वतीने सोमवारी उपोषण करण्यात आले .या उपोषणात औसा तालुक्यातील अनेक दिव्यांग महिला पुरुष यांनी सहभाग नोंदविला .ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक यांची बैठक घेऊन 5  टक्के राखीव दिंव्यांगावरील  खर्चाच्या निधीचा आढावा घेऊन खर्च करण्यास ग्रामपंचायतीला बाध्य करण्यात येईल असे लेखी पत्र गटविकास अधिकार्‍यांनी दिल्यानंतर दिव्यांगाचे उपोषण मागे घेण्यात आले .या आंदोलनात संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर सर्जे, जिल्हाध्यक्ष आत्माराम मिरकले ,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूजा सर्जे, तालुका अध्यक्ष सूर्यकांत पवार, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष लक्ष्मीबाई चिल्ले, गोविंद तावसे, शमसुद्दीन तांबोळी ,विशाल सरजे ,सोमनाथ ढगे, गुरुनाथ मुळे यांच्यासह तालुक्यातील अनेक दिव्यांग सहभागी झाले होते या उपोषणास प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष ओम हजारे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या