मध्य रेल्वेच्या झोनल सल्लागार समिती सदस्यपदी निजाम शेख यांची निवड सलग तिसऱ्यांदा मिळाला बहुमान

 


मध्य रेल्वेच्या झोनल  सल्लागार समिती सदस्यपदी निजाम शेख यांची निवड 

सलग तिसऱ्यांदा 
मिळाला बहुमान





   लातूर/प्रतिनिधी:महाराष्ट्र, मध्यप्रदेश व कर्नाटक या तीन राज्यांच्या राज्यांचा समावेश असणाऱ्या रेल्वेच्या झोनल सल्लागार समितीवर रेणापूर तालुक्यातील दर्जी बोरगाव येथील रहिवासी तथा पत्रकार निजाम शेख यांची फेरनिवड करण्यात आली आहे.विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वेळी शेख यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे.
   स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या शिफारशीवरून निजाम शेख यांची पहिल्यावेळी झोनल रेल्वे सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. पहिल्या कार्यकाळात शेख यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली.आता तिसऱ्या वेळी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या मांडणे व त्या सोडवून घेण्याचे काम या समितीमार्फत केले जाते विविध ठिकाणचे खासदार व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या समितीचे सदस्य असतात.समितीच्या होणाऱ्या बैठकांमध्ये प्रवाशांच्या समस्या मांडून त्या सोडवून घेण्यासाठी निजाम शेख यांनी आपल्या पदाचा वापर आजवर केलेला आहे. स्व.गोपीनाथराव मुंडे यांची शिफारस आणि माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सहकार्यातूनच आपल्याला या कार्याची संधी मिळाली असून भविष्यात रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण तत्पर राहणार असल्याचे मत निजाम शेख यांनी नियुक्तीनंतर व्यक्त केले.
  सलग तिसऱ्या वेळी झोनल रेल्वे समितीवर निवड झाल्याबद्दल निजाम शेख यांच्या यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या