सवलतीच्या दरातील बियाण्यापासून अनेक शेतकरी वंचित
औसा प्रतिनिधी खरीप पेरणीसाठी सोयाबीन व इतर बियाणे अनुदानावर घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करून लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे खरेदीसाठी तालुका कृषी कार्यालयातून परमिट देण्यात आले आहेत. परंतु 24-5-2021 ही ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख होती अनेक शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्याने बहुतांश शेतकरी सवलतीच्या दरात मिळणाऱ्या बियाण्यापासून वंचित राहणार आहेत. सारोळा येथे 1250 आणि एरंडी येथे 425 खातेदार असून कृषी सहाय्यकाने गावात शेतकऱ्यांना माहिती न दिल्यामुळे सारोळा व एरंडी या दोन गावातून केवळ 12
शेतकऱ्यांची निवड झाली आहे. वास्तविक पाहता दोन्ही गावात 1675 खातेदार असताना येथील कृषी सहाय्यकाने गावात माहिती दिली नाही .तसेच शेतकरी वर्गात अनेक जण अशिक्षित असल्याने शेतकऱ्यापर्यंत ही माहिती देण्यासाठी कृषी सहायक आने टाळाटाळ केली आहे. गावात दवंडी देऊन शासकीय योजनेतील अनुदानित बियाण्यासाठी ग्रामीण भागात शेतकरीवर्गात जनजागृती केली नसल्यामुळे गरीब व गरजूंना अनुदानित बियाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. सामान्य शेतकरी वर्गाला कोरोनाच्या संकट काळात चढ्या भावाने बियाणे खरेदी करावे लागणार आहे .एरंडी व सारोळा येथील कृषी सहाय्यक टेकाळे यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने संबंधित कृषी सहाय्यकावर कार्यालयीन कार्यवाही करावी अशी मागणी लक्ष्मण काळे, प्रल्हाद गिरी ,दिनकर लांडे ,या शेतकऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.