*चिंतनीय लेख आहे,अजिबात राजकीय नाही, प्रत्येकाने आवर्जून वाचावाचं*
*निष्क्रिय भविष्यकडे भारताची वाटचाल...!!!*
*नुसतं राजकारणच हे जीवन नाही.*
*बलशाली राष्ट्र बनवायचे असेल वेगळ्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे...उठा !! जागे व्हा*
*आज बालवाडीपासूनच फुकटचा भात,अंडी, शिरा देउन बाल मनापासूनच लाचारीची सुरुवात होते व पुढे तरूणपणी दहा रुपयांत जेवण, 100 यूनिट्स वीज फुकट, रेशन सरसकट, आवास योजनेंतर्गत निरर्थक सूट, ऊठसूठ कर्जमाफी ह्या गोष्टींची आशा लावून सध्याच्या (व पूर्वीच्या ही) सरकारने आणू घातलेल्या या योजना समाजाच्या मानसिकतेवर अतिशय घातक परिणाम करीत आहेत.*
*देशात सध्या जवळपास 67% लोकसंख्या तरुणांची आहे, हेच प्रमाण महाराष्ट्रातही आहे. ज्या वयात आपले भविष्य घडवण्यासाठी कष्ट करायला हवेत त्या वयातल्या तरुणाला महिना 600 रुपये देऊन वरून जेवण, वीज मोफत व सरसकट कर्जमाफी अशाने त्यांची विधायक क्रयशक्तीच संपत चालली आहे.*
*यामध्ये अजून एक भयंकर गोष्ट म्हणजे असे की गेल्या 10 वर्षापासून इ. 1ली ते 8वी पर्यंत परिक्षाच नाहीये. (9 वी साठी ही वर्गोन्नतीचे अलिखीत आदेश आहेत) त्यामुळे तरूणपिढीचा भविष्यकाळ खूपच कठिण असणार आहे.*
*ग्रामीण भाग असो किंवा शहरातील चौक बहुतांश ठिकाणी महागड़े मोबाईल, बाईक, तोंडात गुटखा, अशी ही बहुतांश तरुणाई पार PM कसा चुकीचा, CM कसा चुकतो पासून गावातल्या फ्लेक्सवर आपला फ़ोटो कोणत्या पोज़मध्ये टाकायचा फक्त याच चर्चेतच असतो.*
*आता हीच तरुणाई या फुकटचे दान वाटणाऱ्या राजकीय पक्षांच्या सतरंज्या उचलायला उपलब्ध होते. फुकट जेवण, फुकट वीज, थोडासा बेरोजगार भत्ता, फुकट रेशन याने एक आख्खी कर्तृत्ववान पिढी बरबाद होणार आहे.*
*आजच्या तरुणाकडे आशिष्ठः द्रढिष्ठाः बलिष्ठाः ही सामर्थ्य असायला हवीत, हा तरुण धेयवादी असावा तरच तो या गोष्टींना लाथ मारील व मला फुकटचे नको असे सांगेल.*
*सगळेच फुकट अशी सवय लागली की पुढच्या सरकारकडून हीच त्यांची अपेक्षा राहणार. कोणतीही गोष्ट आकाशातून फुकट पड़त नसते, या साठी लागणारा निधी जे 5-6 टक्के करदाते आहेत त्यांच्या व शेवटी शेतकऱ्यांच्या मुळावर महागाईचे रुपात येऊन पडते.*
*स्विट्झजरलैंडमध्ये 3-4 वर्षांपूर्वी सर्व नागरिकांना सरकारने तिजोरीत शिल्लक असलेली गलेलट्ठ रक्कम दरमहा फुकट देऊ केली होती.*
*तेव्हा 77% लोकांनी आम्हाला फुकटचा पैसा नको, आमची क्रयशक्ती कमी होईल असे सांगून त्याला तिव्र विरोध केला.*
*आपल्याला स्विट्जरलैंडची सौंदर्य, सुबत्ता दिसते पण त्या मागे प्रत्येक नागरिकाची जिद्द कर्तव्यनिष्ठता आपण विसरतो.*
*आपल्याला जर खरच स्वतःला आणि देशाला संपन्न करून प्रगतिपथावर न्यायचे असेल तर सगळेच फुकट ही मानसिकता सोडायला हवी, आणि अशी अफू देणाऱ्या व्यवस्थेला पण दूर करण्याचा निश्चय प्रत्येकाने आज मनापासून करायला हवा. सरकारने देखील फुकट नव्हे तर जीवनावश्यक वस्तू रास्त भावात द्यायलाच हव्यात.*
*अन्न खाण्यासाठी पैसे नाहीत, किमान आपण राहत असलेल्या घराचे 100 युनीटस् चे बिल भरण्याचे पैसे नाहीत अशी अवस्था एखादं दुसरी अपवादात्मक बाब सोडता कुठेही नाही. मोबाईल, राजकारण, अतिरंजित मीडिया, जात, धर्म या विळख्यातून मुक्त होण्यासाठी धड़पडणाऱ्या तरुणाईला ही फुकटची अफू निर्बल निष्क्रिय करण्याचा धोका होतो.*
*यातूनच मग आपल्या संतानी म्हटल्या प्रमाणे*
*'रिकामे मन, सैतानाचे घर' यानुसार दुराचार बलात्कार, व्याभिचार, लुटमार वाढतात व राष्ट्राचे प्रगतीऐवजी यातून नुकसानच जास्त होते*.
*आत्ताचे सोडा पण आपल्या पुढच्या पिढीचा नक्कीच विचार करा* 🙏
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.