राज्यपाल महामहीम भगतसिंह कोश्यारी यांची
ना.अमित विलासराव देशमुख यांनी घेतली भेट
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विदयापीठ अंतर्गत येणारे विषय व वैदयकीय परीक्षेसंदर्भाने चर्चा
मुंबई प्रतिनिधी (सोमवार दि. ७ जून २१)
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आज सोमवार दि. ७ जून रोजी सांयकाळी राजभवन येथे जाऊन राज्यपाल महामहीम भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या अनेक विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर राज्यात होऊ घातलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेसंदर्भातील माहिती त्यांना अवगत केली. या संदर्भाने त्यांचे मार्गदर्शन व सूचनाही ना. अमित विलासराव देशमुख यांनी घेतल्या.
याभेटी दरम्यान वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक खात्याशी संबंधित इतर काही विषयावर राज्यपाल महोदयांनी काही सूचना केल्या. या विभागाच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून होणाऱ्या कार्यवाही संबंधी वेळोवेळी त्यांना माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील असे ना. देशमुख यांनी सांगितले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या दरम्यान यावेळी राज्यातील कोरोना प्रादुर्भांवाची सद्यस्थिती, लसीकरण मोहीम, तसेच मान्सूनचे आगमन आदी विषयावर साधक-बाधक चर्चाही झाली.
-------------------
Mr.Mazharoddin Patel
Editor-Latur Reporter
Mo.No.9975640170,
http://laturreporter.com
News And Videos for information
Email: laturreporter2012@gmail.com
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.