*वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण अभियान*
*शाळा, महाविद्यालय परिसर हरित करणार : प्रा.योगेश शर्मा*
*प्रशांत नेटके यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमाला सुरुवात*
लातूर - गत सात वर्षांपासून लातूर शहर अन जिल्ह्यात पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने शाळा अन महाविद्यालय परिसर हरित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत वासनगाव येथील राजनंदा विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
प्रशांत नेटके यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. कृष्णाई प्रतिष्ठान संचलित राजनंदा विद्यालय परिसरात मोहगणी, कडुनिंब, कदंब, आकाश मोगरा, बकुळ आदी पर्यावरण पूरक झाड लावण्यात आली. शिवाय, सदर झाडे जगविण्याची जबाबदारी प्रत्येक शिक्षकाना देण्यात आली. वसुंधरा प्रतिष्ठानने 2016 पासून 'एक विद्यार्थी-एक वृक्ष' हा उपक्रम हाती घेत आजवर अनेक शाळा अन महाविद्यालयात वृक्षारोपण करून अनेक झाडे शाळा प्रशासन अन विद्यार्थ्यांच्या मदतीने जगविली आहेत.
या वृक्षारोपण उपक्रमास प्रशांत नेटके, शाळा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोळगे, सचिव शिवराज कोळगे, प्राचार्या सुष्मिता सगरे, शिक्षक श्रीनिवास पांचाळ, विष्णू भोंडवे, गुरुराज पाटील, मनोज वाघ, अंजुषा कव्हाळेकर, अश्विनी पाटील, लिपिक दिग्विजय वीर, सुनील कसबे यांच्यासह वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, कायदेविषयक सल्लागार Adv.अजित चिखलीकर, कार्याध्यक्ष अमोल स्वामी, सदस्य शिवाजी निरमनाळे, राहुल माशाळकर आदींची उपस्थिती होती.
"एक शिक्षक:एक वृक्ष"
=================
शाळा परिसरात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक शिक्षकांवर देण्यात आली. वृक्ष लागवड अन संवर्धन कार्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानने केले. शाळेतील शिक्षकांनी पुढील वर्षी या झाडांचा वाढदिवस करण्याचा संकल्प केला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.