राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती पूर्वी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसणार का
असे सोशल मीडियावर मराठा लिबरेशन टायगर संघटनेचे पत्र लातूरचे पालकमंत्री अमितभैया देशमुख तसेच महापौर विक्रांत गोजमगुंडे याना
*कोण होते राजर्षी शाहू महाराज* असे पत्र
लातुर प्रतिनिधी
फक्त ब्राह्मणासाठी खुला असलेला पंचगंगेच्या घाट 1900 साली महाराजांनी सर्वांसाठी खुला केला
1908 साली राधानगरी हे धरण बांधले संस्थानात हरित क्रांती केली
1917 साली प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले आणि शाळा बुडविणार्याला दंड ही लावला, स्वतंत्र भारतात 2009 उजाडले
1917 स्त्रियांसाठी साली पुनर्विवाह, आंतरजातीय विवाहाचा कायदा पास केला तसेच 1920 ला घटस्फोट चाही कायदा पास करून स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते बनले, याचीच सुधारित आवृत्ती म्हणजे बाबासाहेबांचं हिंदू कोड बिल
1918 साली महारांची बलुते पद्धत बंद केली
व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शाहूपुरी बाजारपेठ उभारली, मिरज कोल्हापूर हा रेल्वेमार्ग स्थापन केला, त्यामुळे 6 लाख रुपये असणारी निर्यात 30 लाख झाली
भटके विमुक्त जातींना महालात नोकरी देऊन प्रवाहात आणले
बहिणीचा आंतरजातीय विवाह करणारे
गंगाराम कांबळे ला हौद बाटवला म्हणून मारणाऱ्या सैनिकास राजांनी स्वतः मारून , गंगाराम कांबलेश हॉटेल टाकून दिले
गणपा पवार या दलित शिपायास शिलाईमशिन देऊन राजवाड्यातील सर्वांचे कपडे त्याकडून शिवून घेतले
वडिलांचं श्राद्ध मुद्दाम पुण्यात घालून त्यात पितर म्हणून महार, मांग, धोर, चांभार इत्यादी जातींना बोलवून त्यांच्यासोबत पंगतीत बसून जेवण केले
कामगारांना पीएफ लागू केला
1919 साली अस्पृश्यता न पाळण्याचा कायदा
शिमग्याच्या सनातील स्त्री विषयी घाणेरड्या शिव्या वर बंदी घालणारे
बाबासाहेबांवर प्रभाव असणारे केळुसकर गुरुजींचे बुद्धचरित्रास , शिवचरित्रास आर्थिक सहाय्य करणारे
दलित पैलवाणास नाव बदलवून स्पर्धेस पाठवणारे
अश्या असंख्य गोष्टी त्या राजाबद्दल सांगता येतील, राज्यकर्ता कसा असला पाहिजे याच छत्रपती शिवरायांच्या नंतर मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शाहू महाराज होत. याची आपणास माहिती असेलच असे जर आम्ही ग्राह्य धरले तर आपण लातूर शहरात तीन वर्षे झाले छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे काम ताटकळत ठेवले त्याच्या मागून इतर कामे झाली. असे का ? स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास, कमानिस एक न्याय आणि महामानवाच्या पुतळ्यास एक न्याय हे चुकीचे आहे आणि साहेबांस हे अजिबात आवडले नसते.
तरी आपण लक्ष देऊन या जयंतीच्या पूर्वी तरी शाहू चौकात राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवाल ही माफक अपेक्षा.
अन्यथा आम्हला प्रशासनासोबत संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असे
महेश गुंड ( सं. अध्यक्ष :- मराठा लिबरेशन टायगर संघटना
मोहन गोरे जिल्हा सचिव:- मराठा लिबरेशन टायगर संघटना यांनी असा ही इशारा दिला आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.