मुंबईच्या सायन येथील लोकमान्य वैद्यकीय महाविद्यालयात लातूरच्या मुक्ता शामसुंदर सोनी हिने रेखाटली अप्रतिम शिवराज्याभिषेकाची कलाकृती.*

 *मुंबईच्या सायन येथील लोकमान्य वैद्यकीय महाविद्यालयात लातूरच्या मुक्ता शामसुंदर सोनी हिने रेखाटली अप्रतिम शिवराज्याभिषेकाची कलाकृती.*





मुंबई : दि. ७ - बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारा संचलित लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय सायन या महाविद्यालयात १९ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी या महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकणारी लातूर येथील विद्यार्थिनी कुमारी मुक्ता श्यामसुंदरजी सोनी हिने रेखाटलेली शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याची सुंदर आणि अप्रतिम कलाकृती महाविद्यालयात प्रेक्षणीय आणि आकर्षक ठरली आहे. 

कुमारी मुक्ता सोनी हि लातूर येथील लायन डॉक्टर श्यामसुंदरजी सोनी आणि लायन सौ. अंजू सोनी यांची कन्या असून डॉक्टर ओमकार श्यामसुंदरजी सोनी यांच्या भगिनी आहेत. 

कुमारी मुक्ता सोनी तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण लातूर येथील श्री देशिकेंद्र विद्यालय तर बारावी पर्यंतचे तिचे शिक्षण लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयात झालेले आहे. तसेच मुक्ता सोनी ही बास्केटबॉल मधील राष्ट्रीय खेळाडू असून बॉक्सिंग मधील राज्य पातळीवरील खेळाडू आहे. 

तिने रेखाटलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची अप्रतिम कलाकृती पाहून लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या या कलाकृतींमुळे संपूर्ण महाविद्यालयात लातूर चे नाव झाले आहे. लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनीही कुमारी मुक्ता सोनी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या