जिल्हयातील तलाव ठेका सभेचे 11 ऑगष्ट रोजी आयोजन
लातूर,दि.30 (जिमाका):- जिल्हयातील 500 हेक्टर खालील जलक्षेत्राचा वंजारवाडी ता.रेणापूर (सरासरी जलक्षेत्र 17.00 हेक्टर ) हा पाटबंधारे तलाव लातूर जिल्हयातील मत्सयव्यवसाय सहकारी संस्थातंर्गत (बोली) जाहिर लिलाव पध्दतीने ठेक्याणे देण्यासाठी दि.11 ऑगष्ट 2021 रोजी दुपारी ठिक 12-00 वाजता सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय,लातूर यांच्या अध्येक्षतेखाली जिल्हास्तरीय तलाव ठेका समितीचे आयोजन त्यांच्या दालनात केले आहे.
या सभेमध्ये लातूर जिल्हयातील पाटबंधारे तलाव जाहिर लिलावा पध्दतीने ठेक्याणे देणे बाबत कार्यवाही प्रस्तावित आहे. लिलावाताील तलावाचे नाव ,न्युनतम ठेकारक्कम,तलाव ठेका सुरक्षा,अनामत रक्कम व वार्षिक इष्टतम मत्स्यबोटुकली संचयन किंमतीच्या 10 टक्के रक्कम तसेच अटी व शर्ती सहायक आयुक्त मत्स्यव्यवास,लातूर यांच्या कार्यालयात (सुट्टीचे दिवस वगळून)कार्यालयीन वेळेत पाहण्यास मिळतील पात्र संस्थांनी बोली प्रक्रियेत भाग घ्यवा. असे आहवान करण्यात येत आहे.
भाग घेणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहाकारी संस्थाना शासन निर्णय,अटी व शर्ती नुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता दि.11 ऑग्स्ट 2021 रोजी दुपारी 12-00 वाजेपर्यंत सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय लातूर या कार्यालयास सादर करावे असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवास लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.