१ जुलै डॉक्टर्स डे, सीए डे, किसान डे निमित्त 200 वृक्ष लागवड ,

 

धम्मअंकुर बोद्ध विहार येथे २०० वृक्षांचे रोपण.
ग्रीन लातूर वृक्ष टीम, एम.एस. बिडवे इंजीनियरिंग कॉलेज एलुमिनी असोसिएशन, रोटरी क्लब लातूर, इनरव्हील क्लब एरिया २४ लातूर यांचे वतीने धम्मअंकुर बोद्ध विहार, मळवटी नगर येथे ऑक्सिजन पार्क करिता २०० मोठ्या वृक्षांचे रोपण करून सर्व झाडांना काठ्या लावून झाडांना पाणी देण्यात आले.*
१ जुलै डॉक्टर्स डे, सीए डे, किसान डे, रोटरी क्लब ऑफ लातूरचा नवीन पदाधिकारी यांचा पहिला दिवस, स्टेट बँक ऑफ इंडियाचा वर्धापन दिवस, ग्रीन लातूर वृक्ष टीमचा अविरतपणे ७६१ वा दिवस यानिमित्ताने आज वृक्षारोपण करण्यात आले.
सोबत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना १०० फळांच्या झाडांचे वाटप करण्यात आले.
कडुनिंब, आंबा, चिंच, करंज, गुलमोहर, बदाम, शाल्मली, महुवा, सप्तपर्णी, चाफा, जांभूळ अशा विविध प्रजातींची झाडे लावून ग्रीन बेल्ट झाडांनी सुशोभित करण्यात आला.


यावेळी लातूर मनपाचे आयुक्त श्री अमनजी मित्तल, बिडवे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी, इनरव्हील क्लबच्या सदस्या, SBI बँकेचे अधिकारी, महानगर पालिका कर्मचारी, परिसरातील नागरिक, बुद्ध विहारचे पदाधिकारी  उपस्थित होते.*
डॉक्टर्स डे, सीए डे, किसान डे, SBI वर्धापन दिन निमित्ताने उपस्थित डॉक्टर्स, सीए, शेतकरी, SBI अधिकारी यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.
ग्रीन लातूर वृक्ष टीमचा फक्त झाडे लावणे हाच उद्देश नसून वृक्षप्रेमी नागरिकांची चळवळ उभी करणे व झाडांचे संगोपन करणे हे ध्येय आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांपैकी एक महिना बिना पाण्याचा गेला त्यात ही ग्रीन लातूर वृक्ष टीम टँकरद्वारे पाणी देऊन झाडे जगवत आहे याबद्दल सर्वांनी ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या सदस्यांचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या