वृंदावन कॉलनीत 'एक घर:दोन झाड' उपक्रम
201 झाडांची ट्री गार्डसह लागवड
वसुंधरा प्रतिष्ठान, वृंदावन चॅरिटेबल ट्रस्ट, मनपाचा संयुक्त उपक्रम
लातूर - लातूर येथील वसुंधरा प्रतिष्ठान, वृंदावन चॅरिटेबल ट्रस्ट आणि लातूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शहरातील वृंदावन कॉलनी भागात 'एक घर:दोन झाड'हा उपक्रम राबवून प्रत्येक नागरिकाला वृक्ष संवर्धन साठी दत्तक देण्यात आले. या भागात २०१ झाडांची ट्री गार्डसह लागवड करण्यात आली.
कार्यक्रमास लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नगरसेवक अनंत गायकवाड, नगरसेविका शोभाताई पाटील, उपायुक्त मयुरा शिंदेकर, वृंदावन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्रनाथ मल्लिनाथ महाराज, उपाध्यक्ष ललिता चिंते, सचिव बसवराज स्वामी, सहसचिव अमिता देशपांडे, कोषाध्यक्ष राजेश भांडे, वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, नूतन अध्यक्ष Adv. अजित चिखलीकर, कोअर कमिटीचे अध्यक्ष उमाकांत मुंडलीक, समन्वयक रामेश्वर बावळे, मनपा क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी, गजानन सुपेकर, माधव पिटले आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले, वसुंधरा प्रतिष्ठानने सर्वात आधी लातूर शहरात वृक्षांची चळवळ उभी केली. नाविन्यता हीच वसुंधरा प्रतिष्ठानची खरी ओळख असून वृक्षारोपण सह संवर्धन बाबतीत नेहमीच या संस्थेने पुढाकार घेतला आहे. प्रा.योगेश शर्मा यांनी ७ वर्षांपूर्वी उभी केलेली वृक्ष चळवळ लोकचळवळ म्हणून पुढे येत आहे. वसुंधरा प्रतिष्ठानला मनपाच्या वतीने वृक्ष लागवड साठी मदत करू असे आश्वासन दिले. यावेळी वृंदावन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महापौर आणि उपमहापौर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सर्व मागण्या मान्य करून लवकरच त्या पूर्ण करून असे महापौर यांनी सांगितले. शिवाय, लातूर मधील पहिली गॅस पाईपलाईन वृंदावन कॉलनीत उभारू असेही म्हटले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृंदावन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्रनाथ महाराज होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव बसवराज स्वामी यांनी करून कार्यक्रम आयोजना मागील भूमिका विशद केली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाल आणि फळझाड देऊन अनोख्या पध्दतीने करण्यात आला. यावेळी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, उपायुक्त मयुरा शिंदेकर, नगरसेविका शोभाताई पाटील, प्रा.योगेश शर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.हणमंत पवार यांनी केले, तर आभार प्रा.राजेश भांडे यांनी मानले. यावेळी वृक्ष संवर्धन केल्याबद्दल प्रकाश काळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. टीम वसुंधरा सतत सात वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात भरीव कामगिरी देत असल्याबद्दल महापौर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या भागात बकुळ, आकाश मोगरा, कडुनिंब, मोहगणी आदी वृक्षांची लागवड करण्यात येऊन प्रत्येक झाडाला संरक्षण साठी ट्री गार्ड बसविण्यात आले. ट्री गार्डची व्यवस्था वृंदावन चॅरिटेबल ट्रस्ट यांनी केली. परिसरातील नागरिकांनी आणि वसुंधरा प्रतिष्ठान सदस्यांनी श्रमदान करून झाडे लावली. लावलेल्या प्रत्येक झाडास काळी माती अन खत टाकण्यात आले.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य विश्वजीत भारती, हेमंत भावसार, जयदेव बिडवे, मधुकर सोनवणे, बाळासाहेब मसुरे, रमेश विश्वकर्मा, नंदकुमार धानुरे, प्रकाश काळे, धीरज राजमाने, दत्तात्रय आनंदगावकर, उदय पाटील, सिद्राम चाकोते, सिद्धेश्वर कुठार, बालाजी लकडे, भीमाशंकर सिध्देश्वरे, वीरभद्र स्वामी, शिवाजी तांबाळे, बाळासाहेब रेड्डी, डॉ.संदीप घोणशीकार, प्रदीप पाटील, वसुंधरा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अमोल स्वामी, प्रवक्ते हुसेन शेख, संतोष धनुरे, सदस्य राहुल माशाळकर, कृष्णा काळे, गौस मणियार, अभिजित कोरनुळे, दत्ता जाधव, रामलिंग बिडवे, संकेत उटगे, विशाल वळसने, प्रसाद कुंभार, प्रवीण कुंभार, प्रसाद कोळी, वैभव वाघ, राहुल पाटील, अजय वळसने, निखील वळसने, संकेत कुलकर्णी, आदित्य ठाकूर आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला परिसरातील महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
'वसुंधरा' च्या सेल्फी विथ ट्री उपक्रमात महापौर, उपमहापौर यांचा सहभाग
वसुंधरा प्रतिष्ठानने सेल्फी विथ ट्री हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येकाने वृक्ष लागवड अन संवर्धन करणे आवश्यक असून लावलेल्या झाडांसोबत सेल्फी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार आणि नगरसेवक अनंत गायकवाड यांनी सहभाग नोंदवून रविवारी लावलेल्या झाडांसोबत सेल्फी काढली.
तब्बल १० तास श्रमदान
वसुंधरा प्रतिष्ठान आणि वृदांवन कॉलनी परिसरातील नागरिकांनी सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत म्हणजे तब्बल १० तास श्रमदान करून ही झाड ट्री गार्डसह लावली. झाडांना आळे करणे, खत टाकणे, आधार देण्यासाठी काठी बांधणे, पाणी देणे ही काम दिवसभर पार पाडण्यात आली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.