कोरोना काळात पतीच्या मृत्यूने एकल झालेल्या महिला पुनर्वसाबाबत धोरण आखणे बाबत
कोरोनाने झालेल्या पतीच्या निधनामुळे 50 वर्षाच्या आतील वयाच्या किमान20000महिला महाराष्ट्रात विधवा आणि निराधार झाल्या आहेत. या महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाने राज्यस्तरीय धोरण जाहीर करावे
निलंगा ( प्रतिनिधी)कोरोनाने झालेल्या पतीच्या निधनामुळे 50 वर्षाच्या आतील वयाच्या किमान20000महिला महाराष्ट्रात विधवा आणि निराधार झाल्या आहेत. या महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाने राज्यस्तरीय धोरण जाहीर करावे या मागणीसाठी व त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र स्तरावर "कोरोना एकल महिला कुटुंब पुनर्वसन समिती"स्थापन झाली असुन 109पेक्ष्या जास्त संस्था त्यात सहभागी आहेत. या संस्था समन्वयाच्या वतीने आम्ही पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना शेकडो ई-मेल केले आहेत त्यात अश्या महिलांच्या न्यायपूर्ण पुनर्वसनाची मागणी केली आहे महिलांच्या पुनर्वसनासाठी संस्था व्यापक पातळीवर त्यांच्या सोबत कामही करत आहेत
आपल्या जिल्ह्यातील अश्या महिलांच्या उदरनिर्वाह व सन्मानाने जगण्याचा प्रश्न गंभीर असून या प्रश्नावर तातडीने पुढाकार घ्यावा यासाठी 14 प्रकारच्या मागण्यांसाठी निवेदन श्री एकल महिला पुनर्वसन निलंगा व संभाजी ब्रिगेड निलंगा तालुका यांच्या कडून तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी लातूर यांना देण्यात आले प्रसंगी राम पवार, फिरोज जहागीरदार, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रमोद कदम,अकबर रईस,मौला पटेल,नसीम तांबोळी, नाईकवाडे उपस्तीत होते इत्यादींच्या त्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.