*कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध करीत काळ्या फिती बांधून केले कामकाज*
दि. 16 - उस्मानाबाद -
राज्य व केंद्र शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध नोंदिवण्यासाठी अखिल भारतीय राज्य सरकारी महासंघाने देशातील २९ राज्यातील कर्मचाऱ्यांना १५ जुलै रोजी राष्ट्रीय विरोध दिन पाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत गुरुवारी जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून कामकाज केले.
यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले, कोरोना महामारीच्या दोन लाटा येऊन गेल्या या काळात आरोग्य व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी संकटाचे निराकरण धैर्याने केले आहे.
अशा कर्तव्यनिष्ठ कामगार, कर्मचाऱ्यांच्या हक्काचा संकोच करणारे कायदे मंजूर केले जात आहेत. सरकारी क्षेत्रातील आस्थापनांची अविवेकी खाजगीकरण केले जात आहे. तसेच विविध विभागातील रिक्त पदे अद्यापही भरलेले नाहीत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे.
त्यामुळे शासनाने रिक्कत पदे भरावीत, सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, कोरोना संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावार नोकरी तसेच आर्थिक लाभ तात्काळ द्यावा, सर्वांचे मोफत लसीकरण करण्यात
यावे, जीएसटी संकलनाचा महाराष्ट्र राज्याचा वाटा राज्याकडे वळता करण्यात यावा आदी मागण्या यावेळी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या. या विविध मागण्यांचे निवेदन
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाचे पंतप्रधानांना देण्यात आले. निवेदनावर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे, सरचिटणीस बालाजी पांचाळ, उपाध्यक्ष ए. एफ शेख, कार्याध्यक्ष यशवंत डोलारे, संघटक रवी मोहिते यांची नावे आहेत. दरम्यान, यानंतरही शासनाने मागण्यांचा विचार केला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद ** प्रतिनिधी **सय्यद महेबुब **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.