२५ जुलै हा दिवस संपूर्ण विश्वात जागतिक टेस्ट ट्यूब बेबी दिवस म्हणून साजरा केला जातो. २५ जुलै १९७८ रोजी इंग्लंडमध्ये जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला होता. मागच्या ४३ वर्षात हे तंत्रज्ञान आणखी अद्यावत, विकसित होत गेले. अपत्यहिन दांपत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम या तंत्रज्ञानाने केले आहे. आज जगात ८० लाखांहून अधिक बाळ या तंत्रज्ञानाने जन्माला आली आहेत. या दिवसाचे महत्व विशद करणारा लातूरचे विख्यात स्त्री रोगतज्ज्ञ तथा ज्यांनी हजारो अपत्यहिन दांपत्यांना अपत्यप्राप्तीचे समाधान दिले अशा डॉ. कल्याण बरमदे यांचा हा विशेष लेख..
------------------------------ --
अपत्यहिन दांपत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारे
आधुनिक तंत्रज्ञान : टेस्ट ट्यूब बेबी
---------------------------
मानवी जीवनात सर्वाधिक सुख, समाधान कोणत्या गोष्टीत असते तर ते घरात
खेळणाऱ्या - बागडणाऱ्या लहान बालकांमुळे. घरात छोटे मूल असल्यावर जे आनंदी वातावरण पाहायला मिळते ते कितीही संपत्ती असलेल्या घरात पाहायला मिळत नाही. घरात सर्व सुखे हात जोडून उभी आहेत,
खेळणाऱ्या - बागडणाऱ्या लहान बालकांमुळे. घरात छोटे मूल असल्यावर जे आनंदी वातावरण पाहायला मिळते ते कितीही संपत्ती असलेल्या घरात पाहायला मिळत नाही. घरात सर्व सुखे हात जोडून उभी आहेत,
मुलांसाठी ते दांपत्य सर्वतोपरी प्रयत्न , उपाय करीत असतात. अशा दांपत्यांसाठी आनंदाची अवघी दारे खुली करण्याचे हे टेस्ट ट्यूब बेबीचे आयव्हीएफ तंत्रज्ञान साधारणतः ४३ वर्षांपूर्वी वैद्यकीय क्षेत्रात आले.
जगात इंग्लंडमध्ये २५ जुलै १९७८ रोजी डॉ. पॅट्रिक स्टेप्टो व रॉबर्ट एडवर्ड्स यांच्या हॉस्पिटलमध्ये लुईस ब्राउन या बालिकेचा जन्म टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने झाला. म्हणून हा दिवस जागतिक टेस्ट ट्यूब बेबी दिवस म्हणून साजरा केला जातोय.
आजघडीला विज्ञानाने, वैद्यकीय शास्त्राने अद्यावत अशी प्रगती केली आहे. टेस्ट ट्यूब बेबीचे हे आयव्हीएफ तंत्रज्ञानही आता पूर्वीपेक्षाही अधिक प्रगत झाले आहे. जगात या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आतापर्यंत ८० लाखांहून अधिक बालकांनी जन्म घेतला आहे. नैसर्गिकरित्या तयार होईनारे भ्रुण हे टेस्ट ट्यूबच्या सहाय्याने फलित करून ते मातेच्या गर्भाशयात सोडण्यात येते. नैसर्गिक बाळ तयार न होता फलनाची प्रक्रिया ही टेस्ट ट्यूबमध्ये, लॅबोरेटरीमध्ये होते केली जाते म्हणून याला टेस्ट ट्यूब बेबी असे म्हटले जाते. ज्या महिलांची गर्भवाहक नलिका बंद आहे तसेच पुरुष बीजात कमजोरी आहे, अशा दांपत्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नसते. अशांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे आणि जीवनात आनंद निर्माण करून देणारे असे आहे. अदयावत आयव्हीएफ तंत्रज्ञानाने गर्भधारणा करणे सुलभ झाले आहे.
सध्याच्या जगात पर्यावरणाच्या वाढत्या असमतोलाने पुरुषातील शुक्र जंतूंचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे या प्रणालीचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. केवळ एवढेच नव्हे तर स्त्रियांमध्येही लग्नाचे वाढते वय, नोकरी - करिअरला प्राधान्य देताना स्त्रिया विवाहानंतर आपल्याला अपत्य प्राप्तीत अडथळे येतील याचा विचारही करीत नाहीत. ही बाब वेळ निघून गेल्यानंतर लक्षात येते. पुरुषही विवाहाचे वय निघून जात असले तरी अगोदर करिअरला प्राधान्य देतात. पण त्यावेळी ही गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही की, विवाहानंतर अपत्यप्राप्ती वेळेत होणे खूप आवश्यक असते. परिणामतः, लग्नाचे वय वाढत असल्याने फलन प्रक्रियेमध्ये विलंब होतो आणि अशा दांपत्यांना आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागतो.
————————————
आयव्हीएफ प्रणाली IVF
----------------------------
या आयव्हीएफ प्रणालीमध्ये स्त्री बीज आणि पुरुष बीज लॅबमध्ये ट्यूबमध्ये ठेवले जातात व फलन झालेले बीज संबंधित महिलेच्या गर्भ पिशवीत सोडले जातात.
………………………………….
आयसीएसआय ICSI
------------------
यामध्ये ज्या पुरुषात शुक्र जंतूंची संख्या व गुणवत्ता कमी असते, त्यांच्या शुक्राणूंवर या प्रक्रियेने फलन करून भ्रुण गर्भ पिशवीत चिटकण्यासाठी सोडले जाते. या प्रक्रियेच्या फलनाचा यशस्वी होण्याचा दर जास्त असतो.
………..,,,,,,…………………………
क्रायो प्रिझर्व्हेशन ऑफ गॅमेक्स स्ट्रोक एमरीओ ( फलित गर्भ गोठविण्याची प्रक्रिया )
------------------------------ -------
यामध्ये स्त्री बीज - पुरुष बीज एकत्रित आणून फलित गर्भ उणे १९६ डिग्री सेंटीग्रेडला गोठवला जातोय. या प्रक्रियेद्वारे पुढील उपचार कमी खर्चात व वारंवार इंजेक्शन न देता केला जातो. तसेच अनुवांशिक आजार नसलेली बाळे गोठवून ठेवली जाऊ शकतात. असे गर्भ ३ वर्षांपासून २० वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवली जाऊ शकतात.
———————————
पीजीडी ( प्री जेनेटिक डायग्नोसिस )
------------------------------ ---------
यामध्ये अनुवांशिक आजार असलेल्या जोडप्यांतील चांगली गर्भ फलन क्षमता असलेले बीज फलनासाठी घेतले जातात. जेणेकरून अनुवांशिकरीत्या चांगली बाळे जन्माला येतात.
———————————
स्त्री बीज दान व भ्रुण दान प्रक्रिया
------------------------------ --------
ज्या जोडप्यात स्त्री बीज - पुरुष बीजांची कमतरता असते,अशा जोडप्यात वरील प्रक्रिया करून गर्भावस्था प्राप्त करता येऊ शकते.
विशेष महत्व :
--------------अपत्यहिन दांपत्यांच्या जीवनात आनंद निर्माण करून देणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणून याकडे पाहिले जाते. वंध्यत्वातील समस्या दूर करून अपत्यप्राप्तीत मैलाचा दगड गाठण्याचे काम या तंत्रज्ञानाने केले आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करून आज लाखो दांपत्य अपत्य सुखाचा आनंद लुटत आहे. जीवनात यापेक्षा दुसरा मोठा आनंद कोणताच असू शकत नाही. दिवसेंदिवस हे तंत्रज्ञान आणखी अद्यावत, विकसित होत चालले आहे. त्याचा लाभ असंख्य अपत्यहिन दांपत्यांना होत आहे.
--------------—————
- डॉ. कल्याण बरमदे ,
स्त्री रोग व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, लातूर.
----------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.