६५ वृक्षांची लागवड करून ६५ वा वाढदिवस साजरा ‘राजमाता जिजामाता' परिवारातर्पेâ प्राचार्य केंद्रे यांचा सत्कार



६५ वृक्षांची लागवड करून ६५ वा वाढदिवस साजरा
‘राजमाता जिजामाता' परिवारातर्पेâ प्राचार्य केंद्रे यांचा सत्कार









लातूर : वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत ६५ व्या वाढदिवसानिमित्त वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून व राजमाता जिजामाता शैक्षणिक संकूल आणि वसुंधरा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ६५ वृक्षांची लागवड करीत प्राचार्य डी. एन. केंद्रे यांचा वाढदिवस शनिवार, दि. २४ जुलै रोजी साजरा करण्यात आला.
वाढदिवस म्हटला की, हार, तुरे, स्वागत समारंभ आदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची प्रथा रूढ झाली आहे. मात्र, सध्या कोविड महामारी असल्याने आणि अनावश्यक खर्च टाळून राजमाता जिजामाता शैक्षणिक संकूल परिवाराच्या वतीने या परिवाराचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरले. यानिमित्त वसुंधरा प्रतिष्ठान आणि राजमाता जिजामाता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, व्होकेशनल विभाग, तुळजाभवानी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व संगमेश्वर प्राथमिक विद्यामंदिरातील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी शाळा परिसर व विविध ठिकाणी ६५ वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच सिसू वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, समन्वयक राजेंद्र जायेभाये, प्रा. कविता केंद्रे, अश्विनी केंद्रे, वैशाली केंद्रे, समन्वयक राणी केंद्रे, राजू मुंडे, डॉ. गणेश नागरगोजे, सचिन जाधव, रविकिरण एडके, अलोक पाचेगावकर, विजयकुमार लोहारे, सदाशिव शिंदे, मदन धुमाळ, रमेश बिराजदार, शोभा कांबळे, सुनीता जवळे, अनुराधा पाटील, पांडुरंग कुलकर्णी, प्रा. बी. बी. खटके, प्रा. एस. आर. धुमाळ, प्रा. नभा बडे, प्रा. बदने, प्रा. बी. डी. मुंडे, प्रा. के. डी. मुंडे, प्रा. राजू जाधव, एस. एन. वाडीकर, परमेश्वर गित्ते, दयानंद शिंदे, वसुंधरा प्रतिष्ठानचे अ‍ॅड. अजित चिखलीकर, अमोल स्वामी, राहुल माशाळकर, कृष्णा काळे, रवि लोंढे आदी उपस्थित होते.
दरम्यान, पालकमंत्री अमित देशमुख, आ. विक्रम काळे, शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, एस. एस. सी. बोर्डाचे सचिव सुधाकर तेलंग, उच्च शिक्षण सहसंचालक, नांदेडचे सुभाषराव धोंडगे, प्रा. मुकूंद बोकारे, ‘जुक्टा'चे अध्यक्ष प्रा. शिवराम सूर्यवंशी, प्रा. मारुती सूर्यवंशी, प्रा. गोविंदराव घार, प्रा. रणजीत मदने, विजय जाधव, प्रा. शिवाजी शिंदे, डॉ. शैलजा पैकेकर, डॉ. जोत्सना गव्हाणे, अरुण करदुरे, मुख्याध्यापक अविनाश पवार, प्रा. दयानंद काळे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, सोलापूरचे पोलिस निरीक्षक शिवशंकर बोंदर, प्रशांत बोंदर, सज्जनकुमार लोणाळे आदींनी प्राचार्य डी. एन. केंद्रे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या