दहावी सीबीएसई परीक्षेत शारदा स्कूलच्या
दोन विद्यार्थिनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत झळकल्या
दोन विद्यार्थिनी राष्ट्रीय गुणवत्ता यादीत झळकल्या
लातूर, दि.१४ - नवी दिल्लीतील केंद्रीय बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी सीबीएसई बोर्डाच्या २०१९ - २० च्या परीक्षेत येथील शारदा इंटरनॅशनल स्कूलच्या प्रणाली शिंदे व दिशा निनगुरकर या विद्यार्थिनींनी गणित विषयात देशात पहिल्या ०.१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले. शाळेचे प्रशासक एल. एम. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून त्यांचे कौतुक करण्यात आले.
कॉक्सिट परिवारातील शारदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरीक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक गुणवाढीकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येते. विद्यार्थ्यांची कसून तयारी करून घेण्यात येते. अल्पावधीतच स्कूलने आपली गुणवत्ता सिध्द करण्यास सुरुवात केली आहे. २०१९ - २० मध्ये झालेल्या केंद्रीय बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत प्रणाली शिंदे व दिशा निनगुरकर यांनी राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांनी गणित विषयात देशातील ०.१ टक्के गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले आहे.
या यशाबद्दल रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांनी दोघींचेही विशेष कौतुक केले. यावेळी स्कूलचे प्राचार्य कैलास जाधव, समन्वयक वैशाली गिरवलकर, शीला शेळके, विलास गायकवाड, परीक्षा विभाग प्रमुख रेहमत सय्यद यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सायली मेनकुदळे यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.