* लाच स्वीकारताना ग्रामसेवक अँटी करप्शनच्या ताब्यात*
अल्ताफ शेख प्रतिनिधी/ उस्मानाबाद
कळंब :- उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हावरगाव येथील ग्रामसेवक 10,000/- रुपयांची लाच रक्कमेची मागणी केली,10,000/- रुपये लाच रक्कम स्विकारल्याने ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय, हावरगाव, ता.कळंब, जि.उस्मानाबाद यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद, यांनी सापला रचुन ताब्यात घेतले
तक्रारदार यांना ग्रामपंचायत कार्यालय, हावरगाव येथील 14 वा. वित्त आयोग या निधीतुन भुमीगत नाली या कामाच्या प्रस्तावात बदल करुन नविन प्रस्ताव सादर करण्यासाठी आलोसे महेश औदुंबर शिंगाडे, वय 42 वर्ष, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय, हावरगाव, ता. कळंब, जि..उस्मानाबाद, मुळ रा. नांन्नज, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर यांनी सदरचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यासाठी एकुण निधीच्या 15 टक्के व सुरवातीस 10,000/- रुपये अशी लाचेची मागणी करुन 10,000/- रुपये लाच रक्कम लता मंगेशकर शाळेकडे जाणारे रोडवरील भिसे हॉटेल, कळंब येथे स्विकारल्याने ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकीया चालु आहे. हि कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. मारुती पंडीत, लाप्रवि, औरंगाबाद, श्री. प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार इफत्तेकार शेख, पांडूरंग डंबरे, सिध्देश्वर तावसकर, अर्जुन मारकड यांनी मदत केली.
कोणताही शासकीय अधिकारी / कर्मचारी महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करुन दिल्या बददल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे संपर्क करण्या बाबतचे आवाहन प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, उस्मानाबाद ( 9527943100 ), अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, उस्मानाबाद ( 8652433397 ), गौरीशंक पाबळे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, उस्मानाबाद ( 8888813720 ) यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.