गुुरुपौर्णिमेच्यानिमित्ताने सी.के.मुरळीकर समाज गुरु पुरस्काराने सन्मानीत
लातूर,दि.२६ः बँक अधिकारी असताना आणि सेवानिवृत्तीनंतरही समाज हितासाठी सातत्याने धडपडणारे सी.के.मुरळीकर यांचा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समाजगुरु पुरस्कार देवून सपत्निक सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष, बँक कर्मचारी सेना महासंघाचे जिल्हाध्यक्ष,युनियन बँक सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी व पेन्शनर असोचे केंद्रीय सदस्य, सद्गुरु श्री कानिफनाथ महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष या पदावर कार्यरत असलेले सी.के.मुरळीकर यांना अगदी तरुण वयापासून समाजाप्रती प्रचंड आस्था असल्याने ते सातत्याने धावून जात असतात,कोरोनाच्या काळात गटई कामगार व श्रमिकांना रेशन किट देवून हात दिला.समाजातील गुणवंत,होतकरु,धडपड्यांच्या पाठीवर सत्काररुपी प्रेमाची सातत्याने थाप मारली आहे.शिक्षणाविषयीच्या ओढीतून त्यांनी एक मुलगा सरकारी वकील,दुसरा अभियंता बनविले,तर एका उच्चशिक्षित मुलाला जनरल स्टोअर देवून स्वावलंबी बनविले. समाजातील गरुजूंना सदेैव पितृत्वाच्या भावनेतून सहकार्य केले, त्यांच्या या चौफेर कार्याची उतराई म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समाजगुरु पुरस्काराने सी.के.मुरळीकर यांचा सपत्नीक फेटा बांधून,शाल,पुष्पहार व स्मृतीचिन्ह देवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी काष्ट्राईब संघटनेचे राजेंद्र कांबळे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शहराध्यक्ष रवी कुरील,माजी जिल्हाध्यक्ष अनिल कबाडे, शिवसेना नेते चव्हाण,मधुकर शेवाळकर,शिवाजी दामावले, रोहिदास परिषदेचे प्रवक्ते बालाजी साबळे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष धर्मराज उदबाळे यांनी मनोगतात मुरळीकरांच्या कार्याचा गौरव करुन शुभेच्छा दिल्या,तर समाजाने केलेला सत्कार मनस्वी आनंद देणारा असल्याचे मुरळीकरांनी सांगितले.
या प्रसंगी शुभम गुजर,शिव मुरळीकर,प्रशांत मुरळीकर, गौरी मुरळीकर, सुनील ढवळे, रुद्र मुरळीकर आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.