*सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा चित्ररथ, एलईडी व्हॅनद्वारे होणार जिल्हाभरात प्रचार, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन*
दि. 14- उस्मानाबाद -
प्रशासनाच्या वतीने चित्ररथ व एलईडी व्हॅनद्वारे सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रचार करण्यात येत असून, याची सुरुवात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केली.
हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात २० दिवस विविध गावांना भेटी देऊन तेथे थांबून माहिती देणार आहे. दररोज किमान ६० ते ७० किमींचा प्रवास करुन प्रतीदिन तीन याप्रमाणे साठ गावांना भेटी देण्यात येणार आहेत. एलईडी व्हॅन जिल्ह्यातील ६६ गावांमध्ये जाणार आहे. दररोज दोन-तीन गावांमध्ये जाऊन माहिती देण्याचे काम करण्यात येणार आहे.
या चित्ररथ व एलईडी वाहनातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची पुस्तिका व पोष्टर ठेवण्यात आले आहेत. त्याचे वितरणही करण्यात येणार आहे..
येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उद्घाटन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी. जी. अवत, जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर*
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* प्रतिनिधी **सय्यद महेबुब **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.