हजेरी सहाय्यक कृती समितीच्या तालुका अध्यक्षपदी शेख हन्नान
औसा प्रतिनिधी
आमदार विजय गव्हाणे यांनी महाराष्ट्र राज्यातील हजेरी सहायकांच्या प्रश्नासाठी हजेरी सहाय्यक कृती समितीची स्थापना केली असून या संघटनेच्या औसा तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ हजेरी सहाय्यक शेख हन्नान यांची नियुक्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष एस के कुलकर्णी यांनी केली आहे. आमदार विजय गव्हाणे यांच्या आदेशावरून ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष एम बी भदाडे यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात तालुक्याचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे शिवाजी देशमुख लातूर,एम बी राजुरे अहमदपूर ,के के हसनाळे उदगीर, पांचाळ बी जी निलंगा ,आगलावे जळकोट यांचा या नियुक्ती मध्ये समावेश आहे. संघटनेच्या ध्येय धोरणाला अनुसरून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी कार्य करावे असे एस के कुलकर्णी प्रदेश उपाध्यक्ष यांनी नियुक्तीपत्र देताना अपेक्षा व्यक्त केली आहे. आपल्या परिसरातील हजेरी साहयकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे असेही यावेळी म्हटले आहे .शेख हन्नान हे वरिष्ठ हजेरी साहाय्यकअसून त्यांना हजेरी सहायकांच्या प्रश्नाची जाण व अभ्यास असल्यामुळे हाजेरी साहयकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेख हन्नान यांची मदत होणार आहे. त्यांच्या निवडीचे औसा तालुक्यात सर्वत्र स्वागत होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.