दावतपूर येथील अनेक महिलांनी शेळीपालनातुन उत्पन्न वाढवले प्रत्येक घरासमोर एक झाड व शेळ्या साठि दावण

 दावतपूर येथील अनेक महिलांनी शेळीपालनातुन उत्पन्न वाढवले

प्रत्येक घरासमोर एक झाड व शेळ्या साठि दावण



























औसा प्रतिनिधी विलास तपासे औसा तालुक्यातील दावतपुर हे गाव. पाचशे उंबरठ्याचे असून त्यामध्ये मागासवर्गीय वस्तीचे अठ्ठयान्नव घरे आहेत अठ्ठयान्नव

पैकी सात ते आठ घरा मधी शेळीपालनचा व्यावसाय करत नाहीत. बाकीच्या सगळ्या ब्यान्नव घरे शेळीपालनचा व्यवसाय करतात . भूकंप पुनर्वसन मध्ये शासनाने घरे बांधून दिले आहेत. 40 by 50   ह्या जागेवर 15 by 20 चे घर बांधली आहेत. समोर 26 फूट व पाठीमागे 9 फूट जागा शिल्लक राहिल्यामुळे मागासवर्गीय वस्तीमध्ये प्रत्येक घराच्या समोर एक झाड व शेळ्या साठी दावण केली आहे. प्रत्येक घरासमोर कमीत कमी पाच ते सहा शेळ्या म्हैस, गाय, दिसत आहेत. या गावामधे अनेक घरांमध्ये अनेकांना शेती नाही रोज रोजगार लागत नाही. पती किंवा पत्नीला एक दिवस रोजगार लागला की कोणीतरी एक जण शेळ्या घेऊन राखण्यासाठी जात आहेत. घरातील लहान मुल शेळ्या राखण्याचे काम करतात. शेळीपालनामुळे अनेक महिलांना हाताला रोजगार मिळाला आहे. या गावामधे दहा ते पंधरा शेळ्या असलेल्या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत. महादाबाई नामदेव सरवदे, लक्ष्मीबाई तुकाराम कांबळे, सखु भगवान कांबळे, पूजा मिलिंद कांबळे, वैजंता सुग्रीव कांबळे, सुशाला भागवत कांबळे, मिराबाई वाल्मिक कांबळे, मंगल कांबळे, सखुबाई श्रिपती कांबळे. अनेक महिला स्वतः च्या पायावर उभे राहिल्या आहेत. रोजी रोजगार करून शेळीच्या झालेल्या उत्पन्नातून वाढ करून सक्षम झाल्या आहेत. शासनाने अनेक योजना गोरगरीब नागरिक साठी काढली पण कुठलीही योजना या महिलांना मिळालेल्या नाहीत. मागासवर्गीय वस्ती मन्हली की नेहमीच पत्र्याचे व कुडाचे घर दिसतात. रोज रोजाने जायचे व आपल्या पोटाची खळगी भरायची. औसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये विकास झाला नाही परंतु दावतपूर गावामधे शासनाचे कुठल्याही प्रकारचे कर्ज न घेता येथील महिला स्व:ताच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. दावतपूर गाव म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील एक सुधारित गाव असल्याचे दिसून येते. त्या गावामधे प्रत्येक गावामधे सिमेंट रस्ते व रस्त्यावर झाडे लावलेली आहेत. प्रत्येक गल्लीमध्ये पाण्याचा मोठा हौद आहे त्या मुळे पाण्याचा प्रश्न मिठला आहे. शेळ्यांना लागणारे सर्व पाणी हौदातुन घेतात. या गावाला दोन वेळेस पाणी फाऊंडेशन चा पुरस्कार देण्यात आला आहे. स्मार्ट विलेज व गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार देण्यात आला आहे. या गावामधे नेहमीच विकासाची कामे केली जातात त्यामुळे नागरिक समाधानी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या