औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविमा परतावा मिळाला पाहिजे अशी आ. अभिमन्यू पवारांची प्रामाणिक इच्छा आहे का ?शेतकऱ्याच्या पोरांचा सवाल?

 औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविमा परतावा मिळाला पाहिजे

 अशी आ. अभिमन्यू पवारांची  प्रामाणिक इच्छा आहे का ?शेतकऱ्याच्या पोरांचा सवाल

















औसा प्रतिनिधी विलास तपासे भारतीय कृषी विमा कंपनी ही केंद्र सरकारच्या मालकीच्या अखत्यारीत असताना आ. अभिमन्यू पवार यांना औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी अडचण काय आहे, त्यांच्याककडून या प्रश्नासाठी राज्य सरकारकडे बोट दाखवण्याची भूमिका योग्य आहे का असा सवाल तालुक्यातील युवक शेतकरी वर्गातून केला जात आहे.

लातूर जिल्ह्याला भारतीय कृषी विमा कंपनी म्हणजेच AIC ही कंपनी नेमून दिली आहे. या कंपनीवर शंभर टक्के मालकी ही केंद्र सरकारची आहे.

या कंपनीमार्फत औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पिक विमा परतावा मिळावा यासाठी गावोगाव बैठक घेत शेतकऱ्यांच्या पोरांनी अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वात थेट दिल्ली येथील विमा कंपनीचे कार्यालय तसेच केंद्रीय कृषी मंत्रालय देखील गाठले होते.

राज्य सरकारने ५ मार्च २०२० रोजी अध्यादेश काढला की, सरकारने केलेले पंचनामे ग्राह्य धरुन विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा परतावा द्यावा. परंतु राज्य सरकारने काढलेलाच अध्यादेशच जर केंद्र सरकारची मालकी असलेली कंपनी मान्य करत नसेल, तर इतर खाजगी कंपन्यांनी याचा आदर्श काय घ्यावा. विद्यमान आमदार अभिमन्यू पवार जी यांनी राज्य सरकारवर टीका करण्याबरोबरच, केंद्रात त्यांची सत्ता असलेल्या सरकारला त्यांच्या मालकीच्या कंपनीला शेतकऱ्यांना विमा परतावा द्यायला लावला,तर यात नक्कीच शेतकऱ्यांना मदत होईल. "मन की बात" मध्ये पिकविम्या विषयी पंतप्रधान मोदी यांनी ज्या तालुक्यातील शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्याच औसा तालुक्यातील शेतकरी जर केंद्र सरकारच्याच मालकीच्या कंपनीमुळे विम्यापासून वंचित राहत असतील,तर ही फार मोठी शोकांतिका आहे. असा सवाल शेतकाऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या