जमियतुल कुरेश च्या अध्यक्षपदी नसिर कुरेशी यांची फेरनिवड

 जमियतुल कुरेश च्या अध्यक्षपदी नसिर कुरेशी यांची फेरनिवड 

उपाध्यक्षपदी मुजीब कुरेशी




औसा प्रतिनिधी औसा तालुक्यात कुरेशी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जमात-ए कुरेश  ही संस्था कार्यरत आहे. ही संस्था कुरेशी समाजाच्या रूढी परंपरा गेल्या शंभर वर्षा पासून अलिखित स्वरूपात समाज हिताचे काम करते. समाजातील गोरगरिबांना आर्थिक सामाजिक शैक्षणिक व धार्मिक कार्यात अग्रभागी राहून लोकोपयोगी कार्य करणारी ही संघटना समाजातील अंतर्गत वाद-विवाद मिटविण्यासाठी  प्रयत्नशील असते. या संघटनेच्या अध्यक्षपदी नसीर दस्तगीर साब  कुरेशी यांची फेरनिवड झाली असून उपाध्यक्षपदी मुजम्मिल गनिमीया या कुरेशी यांची निवड झाली आहे. जमाते कुरेशी च्या अध्यक्षपदी नसिर कुरेशी मागील पाच वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुनश्च त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे.सर्वधर्मसमभाव जोपासून इतर धर्मियांच्या उत्सवात त्यांचा सहभाग असतो . सवसथेची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे सचिव जावेद रहीम साब, कोषाध्यक्ष हाजी खुद्दुस रज्जाक, सदस्यपदी बाबा हमीद साब  जफर उस्मान साब  येजाज दस्तगीर साब ,अकबर गफार साब,  भैया खाजामिया, वसीम पाशा मिया ,यासीन ईसाक मीया , दाऊद इस्माईल, गौस मोहम्मद साहब, मुनाफ अखलाक मीया , हाकीम सौदागर ,मन्सूर इस्माईल मिया ,यांचा समावेश असून जमाते कुरेशच्या नवनियुक्त कार्यकारणीचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी  अभिनंदन केले  आहे.

नसीर कुरेशी यांच्या फेर निवड बद्द्ल माजी नगरसेवक एडवोकेट मु समीयोद्देन पटेल यांच्या संपर्क कार्यालयात प्रा लइकोद्दीन पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळी मौलाना इरफ़ान सौदागर शफीयोद्देन पटेल, बदीयोदिन पटेल कलिमोददीन  पटेल आदि उपस्थित थे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या