दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन*

 *दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आज ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन*


*वसंतराव नाईक विद्यापीठाचे कुलगुरू अशोक ढवण यांची उपस्थिती*





औसा ( प्रतिनिधी )-  डेक्कन फार्मस् उद्योग समुह व शिवसंकल्प फाउंडेशन  तर्फे  रविवार, १ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी ठीक ६ वाजता ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण तर प्रमुख पाहूणे म्हणून  सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, आभियांत्रिकी क्षेत्रात ४२ वर्षाचा अनुभव असलेले विवेक भोसले हे उपस्थित राहणार आहेत.

दहावी-बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालंकामध्ये करिअर निवडण्याबाबत संम्रभावस्था असते. याकाळात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्यानेच डेक्कन फार्मस् ने करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मुंबई येथील करिअर मार्गदर्शनाचा ३० वर्षाचा अनुभव असलेले संजय मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लेखापाल (सीए) परिक्षेत नुकतीच उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी शेतकरी कन्या प्रज्ञा ढवण ही आपले मनोगत मांडणार आहे.

‘डेक्कन फार्मस्’ या अधिकृत फेसबुक पेजवरून हा कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी दहावी-बारावी व पदवीधारक विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रम समन्वयिका प्रा. डॉ. शुभांगी ढवण यांनी केले आहे........................कृपया सदरील बातमी  आपल्या दैनिकात प्रकाशित करावी  ही विनंती  ......संजय सगरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या