ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करण्याची शिवसेनेची मागणी रात्री ८ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्या - उपजिल्हाप्रमुख सचिन दाने

 


ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करण्याची शिवसेनेची मागणी

 रात्री ८ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्या - उपजिल्हाप्रमुख सचिन दाने








लातूर/प्रतिनिधी:जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात यावेत. व्यावसायिकांना रात्री ८  वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास,व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
  निवेदनात म्हटले आहे की, मागील दीड वर्षापासून कोरोना विषयक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. यामुळे व्यापारी,व्यवसायिक व दुकानदारांचे कंबरडे मोडले आहे.उद्योग देशोधडीला लागले असून व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
  अनेक दिवसांपासून निर्बंध लागू आहेत. प्रशासनाकडून त्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जात आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून असणाऱ्या अर्थचक्राला गती देण्याची गरज आहे.रेणापूर,मुरुड यासारख्या शहरात तसेच छोट्या गावात व्यवसाय-  उद्योग सुरू झाले तर त्यामुळे शेतकरी व ग्रामीण जनतेला दिलासा मिळणार आहे.
यामुळे त्यामुळे प्रशासनाने ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करावेत.सर्व दुकाने,हॉटेल्स,भाजीपाला विक्रीची दुकाने यांना रात्री ८  वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवून व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी.निर्बंधांच्या नावाखाली पोलिसांकडून व्यावसायिकांना दमदाटी केली जात आहे. गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात आहे.हे प्रकार थांबवण्याची गरज आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन ग्रामीण भागातील व्यावसायिक व जनतेला दिलासा द्यावा,अशी मागणीही दाने यांनी निवेदनात केली आहे.
  दाने यांच्या मागणीला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.शासन स्तरावरून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल.काही गावात सवलत देण्याबाबत निर्णय होवू शकतो असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.काही अटींवर वेळ वाढवून दिला जाऊ शकतो असे दिसून येत आहे.
  या निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आली असून व पोलिस अधीक्षकांनाही देण्यात आली आहे.
निवेदन देताना लातूर तालुका प्रमुख ॲड. प्रवीण मगर,कपिल चितपल्ले,ॲड निटूरे,व शिवसैनिकांची उपस्थिती होती.
  पुढील आठवड्यात मुख्यमंत्री आणि जिल्हाप्रमुखांची बैठक होणार आहे.त्यात व्यावसायिकांच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.शिवसेना व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
व्यापाऱ्यांना कांही अडचणी असतील तर त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,असे आवाहनही उपजिल्हाप्रमुख सचिन दाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या