*कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणांना आदेश*
दि 2 - उस्मानाबाद -
कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांची काळजी घेण्याची गरज आहे महिला व बाल विकास विभागाबरोबर इतर शासकीय विभागांनी त्यांच्याकडील योजनांचा लाभ देऊन मदत करावी तसेच जिल्ह्यातील वन स्टॉप सेंटर च्या कर्मचाऱ्यांनी कोवीड 19 मुळे विधवा झालेल्या 1014 महिलांची ग्रह भेट घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या कौटुंबिक छळ बाबतची माहिती घेणे तसेच त्यांना शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ पाहिजे आहे याबाबतच्या विधवा महिलांचे समुपदेशन करून त्यांचे मनोबल वाढवावे या महिलांना महसूल विभागाच्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा या महिलांना लाभ देण्याची आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत 20,000 रुपयांची मदत करण्याची कार्यवाही तहसीलदार यांनी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा नॉनस्टॉप सेंटरचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले
महिला व बाल विकास विभागांच्या 7 मे 2021 च्या शासन निर्णय व सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार कोवीड 19 मुळे पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे तथा योग्य संगोपन होण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली त्यावेळी ते असे बोलत होते कोवीड 19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र मिळवून देण्याबाबत बाल कल्याण समितीने कार्यवाही करावी तसेच जिल्ह्यात एक पालक कमावलेल्या बालकांना सर्व न पा च्या मुख्याधिकारी आणि ग्रामसेवक यांनी या बालकांच्या पालकांचे मृत्यू दाखले मिळवून देण्याबाबत कार्यवाही करावी ज्या बालकांना अभियांत्रिकी शाखेत प्रवेश गुणानुक्रमे प्रवेश मिळत नाही त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी कार्यवाही करता येईल त्यासाठी प्रयत्न करावे असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय कृती दल समिती यांनी एक पालक तसेच दोन पालक गमावलेल्या अशा 108 बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ दिलाला आहे उर्वरित बालकांची माहिती संकलित करून त्यांनाही या योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्या बाबतचे यावेळी त्यांनी सांगितले तसेच दोन्ही पालक गमावलेल यांना पाच बालकांना पाच लाख रूपये मिळवून देण्याबाबत शासनास प्रस्ताव पाठवण्यास मंजुरी देण्यात आली आहे
विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी कोवीड 19 मुळे दोन्ही पालक गमवलेल्या पाच बालकांच्या मालमत्ता बाबत माहिती घेऊन बालकांच्या मालमत्तेचा हक्क मिळवून देण्याबाबत विधि तज्ञांची समिती तयार करण्यात असल्याचे बैठकीत सांगितले
या बैठकीस विधि प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश श्री घाडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हनुमंत वडगावे, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक एस एस बाबर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अश्रुबा कदम, तुळजापूर वाशी भूम परंडा या तालुक्याचे मुख्याधिकारी, जिल्हा परिविक्षा अधिकारी शिरीष शेळके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती कोमल धनवडे आदी उपस्थित होते. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा कृती दल समिती बी एच निपाणीकर यांनी आभार मानले.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.