कोरोनाचे नियम धाब्यावर ढोकी ठाण्याच्या हद्दीत हजारोच्या संख्येने धार्मिक कार्यक्रम धुमधडाक्यात !
उस्मानाबाद / प्रतिनीधी, अल्ताफ शेख
उस्मानाबाद तातुक्यातील ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका समाजाचा धार्मिक कार्यक्रम पार पडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कोरोनाचे नियम धाब्यावर बसवुन कसबे तडवळे, शिवारात पोलीसांच्या मुख समतीने धुमधडाक्यात चालु आसलेला एका समाजाचा कार्यक्रम पोलिसांनीच बंद केला.
राज्यात गेल्या काही दिवसापुर्वी कोरोणा बाबतीमध्ये घालण्यात आलेले नियम कोराणाचा प्रादुर्भाव कमी झाला आसे समजुन शिथील करण्यात आले होते तेव्हा लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करुन पुन्हा कोरोणासदृश्य डेल्टा नावाच्या रोगाला आमंञण दिले व राज्यात पुन्हा काही जिल्हात निर्बंध लादण्यात आले यामध्ये उस्मानाबाद जिल्हाचा देखील समावेश आहे.कोराणाचे निर्बध पुन्हा असताना गेल्या दोन दिवसापासुन कसबे तडवळे येथे पोलीसांच्या मुक संमतीने एका समाजाचा कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडला आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मुख समती दिलेल्याची माहीती परिसरातील काही पञकारांना मिळाली आहे, त्यांनी त्या ठिकाणचे चित्रीकरणही केले असल्याची खबर लागली व लगेच पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा जाऊन सदरील कारण बंद केला व कार्यक्रमात जमलेले सुमारे एक हजारहुन अधिक लोक हुसकवुन लावले आहेत. त्या ठिकाणाला यात्रेचे स्वरुप आले होते. मोठ्या प्रमाणात दुकाने थाटण्यात आले होते. हा कार्यक्रम गेल्या आठवड्यात कसबे तडवळे गावा जवळ लातुर -बार्शी मार्गालगत होणार होता तेंव्हा पोलीसांनी याला कोरोणाचे निर्बाध पुढे करुन हा कार्यक्रमा होऊ दिला नाही त्यानंतर गावातील काही लोकांनी मध्यस्थी करुन सदरील कार्यक्रम हा गावापासुन लांब करण्यास पोलिसांची मुक संम्मती मिळवली व सोमवार मंगळवार या दोन दिवस कार्यक्रम केला.परंतू हा कार्यक्रम तगडा आसल्यामुळे काही पञकारांना यांची खबर मिळाली म्हणुन पोलिसांनी हा कार्यक्रम बंद पाडला या कारणासाठी उस्मानाबाद कळंब तालुक्यातील एक हजारच्या जवळपास लोक जमले होते व तेथे जञेचे स्वरुप आले होते.याबाबत या कार्यक्रमाची माहिती कसबे तडवळे येथील पोलीस पाटलाने ढोकीच्या पोलीसांना दिली होती परंतु या कार्यक्रमाला पोलीसांनीच मुक संम्मती देऊन हा कार्यक्रम पार पाडल्याची कबुली पोलीस पाटलांनी दिल्याची बातमी एका व्रत्तपत्रात छापून आली आहे.त्यामुळे आणखीन संशय बळावत आहे.यापूर्वीही या हद्दीत काही ठिकाणी अशाच स्वरुपाचे मुक संम्मतीने मोठे कार्यक्रम पार पडले आहेत अशी चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.