दहावी परीक्षेत जिल्ह्यातील सव्वाबारा हजारावर विद्यार्थ्यांना 'डिस्टींक्शन' !*

 *दहावी परीक्षेत जिल्ह्यातील सव्वाबारा हजारावर विद्यार्थ्यांना 'डिस्टींक्शन' !*




दि. 17 - उस्मानाबाद -



 *निकाल दहावीचा असो की बारावीचा. प्रत्येक वर्षी मुलीच अव्वल ठरतात. कोरोनाच्या संकटामुळे यंदा शाळांनी केलेल्या अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. याहीवेळी मुलींनीच बाजी मारली आहे. १२ हजार ६५० मुलांचे मुल्यमापन करण्यात आले.* 

 *यापैकी १२ हजार ५७५ जण उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९९.४० टक्के एवढे आहे. तर दुसरीकडे १० हजार ८२ मुलींचे मुल्यमापन करण्यात आले. यापैकी १० हजार २६ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.४४ टक्के एवढे आहे. म्हणजेच, ०.४ टक्क्यांनी अधिक आहे, हे विशेष.* 



कोरोनामुळे यंदा परीक्षा झाल्या नाहीत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आलेल्या अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल तयार करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेला हा निकाल शुक्रवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील २२ हजार ७३२ पैकी तब्बल २२ हजार ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे, यापैकी थोडेथोडके नव्हे तर १२ हजार ४४० परीक्षार्थीना डिस्टींक्शन मिळाले आहे. शाळांनी केलेल्या अंतर्गत मुल्यमापनातही सावित्रीच्या लेकीच अव्वल ठरल्या आहेत. जिल्ह्याचा एकूण निकाल ९९.४२ टक्के लागला आहे.


कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर परीक्षा मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षेची तयारी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हापातळीवर नियोजनही पूर्ण झाले होते. असे असतानाच कोरोनाची दुसरी लाट धडकली. ही लाट तीव्र स्वरूपाची होती. त्यामुळे शासनाने दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. निकाल तयार करण्यासाठी अंतर्गत मुल्यमापनाचा आधार घेण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातील २२ हजार ७३३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. प्रत्यक्षात २२ हजार ७३२ विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करण्यात आले.


त्यामुळे निकाल कधी जाहीर होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. अखेर शुक्रवारी दुपारी परीक्षा मंडळाने ऑनलाइन निकाल जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्याचा निकाल ९९.४२ टक्के लागला आहे. म्हणजेच २२ हजार ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी १२ हजार ४४० विद्यार्थी डिस्टींक्शनमध्ये आले आहेत. ८ हजार ७५ विद्यार्थी असे आहेत, त्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. १ हजार ३२४ विद्यार्थी द्वितीय तर ७८० जण निव्वळ उत्तीर्ण झाले आहेत. ओव्हरवॉल निकालात अवघे १०३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असल्याचे 'शिक्षण'कडून सांगण्यात आले.



*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद ** प्रतिनिधी **सय्यद महेबुब **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या