मोबाईल गेम आणि आँनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना हि मैदानी खेळ विस्मरणात
औसा - रमेश शिंदे
मागील दोन दिवसा पासून आँलम्पिक मधील सुर्वण , रौप्य आणि कास्य पदकामुळे विविध वाहिन्या वर खेळाचे महत्व आणि मिळालेल्या पदका बद्दल चर्चा ऐकायला मिळत आहे.वृत्तपञाचे रकाने भरले जात आहेत.पण दोन वर्षापासून आलेल्या कोरोना मुळे आँनलाईन शिक्षण तसेच मोबाईल मध्ये खेळले जाणारे आँनलाईन गेम यामुळे मैदानी खेळ माञ शालेय विद्यार्थीच नव्हे तर पालकांच्या हि विस्मरणात गेले आहेत.मोबाईल मुळे खेळाची मैदानेच ओस पडत चालली आहेत.त्यामुळे मैदानी खेळातून होणारा शरीराचा व्यायाम आता इतिहास बनतो कि काय अशी भिती व्यक्त केली जात आहे.
मागील कांही वर्षापूर्वी शालेय खेळांना विशेष महत्व होते. अनेक शाळामध्ये शारीरीक शिक्षक हि होते.पण विद्यार्थी खेळा ऐवजी अभ्यास आणि गुणांच्या मागे धावत असल्यामुळे खेळांना माञ विराम मिळताना पाहयला मिळतोय. पूर्वी शाळा सुटली कि विद्यार्थी मैदानावर असायचे कबड्डी, खो-खो,फुटबाँल, व्हाँलीबाँल यासारखे अनेक खेळ शाळामध्ये हि घेतले जायचे तर शाळेबाहेर विट्टीदांडू गोठ्या सुरपारंब्या लपाछपी यासारखे खेळ तर आज मुले कोठे खेळताना हि दिसत नाहीत. पूर्वी या खेळामध्ये मोठ्या प्रमाणावर रममाण व्हायचे. पण मागील दोन वर्षापासून कोरोना मुळे शाळा बंद झाल्या शाळा बंद झाल्यानंतर शिक्षण आँनलाईन सुरु झाले आजही आँनलाईन शिक्षण सुरु असल्यामुळे विद्यार्थी माञ मोबाईल मध्येच गुंतले आहेत. आँनलाईन शिक्षण आणि आँनलाईन गेम यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय क्रिडा प्रकाराला माञ विद्यार्थ्यांनी कायमचेच बंद केल्यासारखी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे.
शालेय क्रिडा स्पर्धाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा, विभाग व राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रिडा स्पर्धा घेतल्या जायच्या पण कोविड मुळे शाळा बंद असल्यामुळे शालेय क्रिडा स्पर्धा होणार कोठून हा प्रश्न आहे. सध्या दोन वर्षापासून कोविड आहे पण मोबाईल गेम आल्यापासून शाळेतीलच क्रिडा प्रकार नव्हे तर मैदानी खेळ हि विस्मरणात जात आहेत. ग्रामीण भागातील विट्टी दांडू, कुस्ती, सुरपारंब्या , कबड्डी, खो-खो हे खेळ मोबाईल गेम मुळे विस्मरणात गेले आहेत. विद्यार्थी मोबाईल गेम मध्ये असले तरी पालक हि आपल्या पाल्याने अधिक गुण मिळवावेत याच मानसिकतेत असल्यामुळे मैदानी खेळांचे माञ विस्मरण होत आहे. कांही पारंपारीक मैदानी खेळ यापुढे फक्त पुस्तकातच वाचायला मिळाल्यास नवल वाटू नये अशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.