लिंगायत महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नागनाथप्पा भुरके, जिल्हा सरचिटणीसपदी चंद्रकांत कालापाटील तर जिल्हा संघटकपदी विश्‍वनाथ सताळकर यांची निवड

 

लिंगायत महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नागनाथप्पा भुरके, जिल्हा सरचिटणीसपदी चंद्रकांत कालापाटील तर जिल्हा संघटकपदी विश्‍वनाथ सताळकर यांची निवड







लातूर ः लिंगायत महासंघ लातूर जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीची बैठक रविवार दि.25 जुलै 2021 रोजी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली कल्पतरु मंगल कार्यालय, लातूर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लिंगायत महासंघाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी नागनाथप्पा भुरके यांची तर सरचिटणीसपदी चंद्रकांत कालापाटील यांची आणि जिल्हा संघटकपदी विश्‍वनाथ सताळकर यांची निवड प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी केली.
लिंगायत महासंघाचे वाढलेले कार्य पाहता जिल्ह्यातील प्रत्येक महत्वाच्या भागाचा समावेश असलेली नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ती अशी जिल्हा उपाध्यक्षपदी शिवाजी भातमोडे, दयानंद मठपती, करीबसवेश्‍वर पाटील, मु.अ.गणपती पटणे, विजयकुमार कुडूंबले यांची तर सहसचिव म्हणून पत्रकार भुसारे, जयराज बेलुरे, चंद्रकांत तोळमारे, तुकाराम कावळे, शिवदास लोहारे, सहसचिव तथा सहकोषाध्यक्षपदी विश्‍वनाथ सावळे स्वामी यांची तर कोषाध्यक्षपदी माणिकप्पा मरळे यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारणी सदस्य तथा वधू-वर मेळावा उपाध्यक्षपदी रमेश होनराव, संगय्या स्वामी यांची तर बीड जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून रमेश वेरूळे यांची तर जिल्हा कार्यकारणीचे सदस्य म्हणून गुरूनाथ हालिंगे, चंद्रकांत झुंजारे, शरण पाटील, सुर्यकांत मळगे, परमेश्‍वर पाटील, राजेश्‍वर हुडगे, विश्‍वनाथ बिरादार, मनोज पोतदार(प्रसिध्दीप्रमुख) यांची निवड करण्यात आली. तर सल्लागार समितीवर प्रमुख म्हणून सिद्रामप्पा पोपडे, विश्‍वनाथप्पा मिटकरी, गोरोबा काका शिवणे, काशिनाथ मोरखंडे, शंकरराव शेटकार, जी.जी.ब्रह्मवाले आणि धनंजय कोपरे आदिंची निवड करण्यात आली. तसेच लिंगायत महासंघाच्या लातूर शहर युवक आघाडीपदी विजय खिंडे यांची तर महिला आघाडी अध्यक्षपदी राधिका कावळे यांची निवड करण्यात आली. तसेच रेणापूर तालुकाध्यक्षपदी राजेश्‍वर उकीरडे यांची तर शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्षपदी काशीनाथ मोरखंडे, तर तालुका संघटकपदी निळकंठ शिवणे यांची निवड करण्यात आली. तर चाकुर तालुका सरचिटणीसपदी योगीराज स्वामी यांची निवड करण्यात आली. तसेच बालाजी दरेकर यांची निलंगा तालुका कार्यकारिणीवर सहसचिव म्हणून तर जळकोट तालुकाध्यक्षपदी संपत हत्ते यांची निवड झाली. तसेच लातूर तालुकाध्यक्षपदी तानाजी पाटील भडीकर, उपाध्यक्षपदी शिवदास बुलबुले, तर सरचिटणीसपदी विजयमुर्ती बिडवे यांची निवड करण्यात आली. लिंगायत महासंघाच्या प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून माजी जि.प.सभापती अ‍ॅड.हलप्पा कोकणे व दिलीप रंडाळे यांची निवड करण्यात आली. तसेच लातूर शहर कार्यकरिणी ही जम्बो असल्यामुळे त्याची निवड स्वतंत्रपणे करणार असल्याचेही सांगण्यात आले. देवणी तालुका व शहर कार्यकारिणी, चाकूर तालुका कार्यकारिणी व औसा तालुका व शहर कार्यकारिणी मंजुरी देण्यात आली. यावरील सर्व पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देवुन प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीस लातूर जिल्ह्यातील असंख्य समाजबांधव उपस्थित होते.
याप्रसंगी बैठकीचे प्रास्तावीक जिल्हाउपाध्यक्ष शिवाजी भातमोडे यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार किशन कोलते यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या