पोहरेगावात ७ हजार झाडांचे रोपण मियांवॉकी वृक्ष लागवडीचा दुसरा टप्पा गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार

 


पोहरेगावात ७ हजार झाडांचे रोपण

मियांवॉकी वृक्ष लागवडीचा दुसरा टप्पा

 गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार











 रेणापूर/प्रतिनिधी:तालुक्यातील पोहरेगाव येथे मियांवॉकी वृक्ष लागवड मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात ७ हजार झाडांचे रोपण करण्यात आले.याच कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थिनीसह गावातील मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.
   सरपंच गंगासिंह कदम यांच्या पुढाकारातून पोहरेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये मियावॉकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सीआरपीएफचे डीआयजी संजीवकुमार यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.सरपंच गंगासिंह कदम यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.बचत गटाच्या महिला,आशाताई, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस,शिक्षक,बँक व ग्रामपंचायतीचे कर्मचारी आदींच्या हस्ते एकूण ७ हजार झाडे लावण्यात आली.
   या उपक्रमाच्या निमित्ताने कोतवाल म्हणून संपूर्ण सेवा पोहरेगाव येथेच करणारे नूरअली सय्यद यांचा सेवानिवृत्ती निमित्त ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण आहेर देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.पंचायत समितीचे सभापती रमेशराव सोनवणे यांचाही शाल,श्रीफळ,फेटा, पुष्पगुच्छ व चांदीच्या गणपतीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
   गावाच्या इतिहासात दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेणारी पहिली विद्यार्थिनी ठरलेल्या ऋतुजा मोरे हिचा विशेष गौरव करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ,फेटा,पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन तिला गौरविण्यात आले.
   प्रारंभी वृक्षलागवड समितीचे अध्यक्ष रामराम मोरे यांच्या हस्ते संजीव कुमार यांचा सत्कार करण्यात आला.
   या प्रसंगी जनता विद्यालयाचे अध्यक्ष उध्ववराव यादव,वृक्ष लागवड समितीचे अध्यक्ष रामराव मोरे,रामराव सरवदे,सदानंद शिंदे,अँड.दशरथ सरवदे,
अँड.शिरीष यादव,अंकुश शिंदे,माणिकराव शिंदे,
चंद्रकांत पाचेगावकर, विनायकराव सरवदे,संतोष लोखंडे,हनुमंत केसरे,शाहुराव हांडगे,सुभाष वाघ,गणपत केसरे,विशालराव मोरे,
बाळकृष्ण मोरे,पांडुरंग सरवदे,उत्तम शिंदे, कमलाकर मोरे,शंकरराव राठोड, बळीराम हांडगे,संदीप वाघ,विकास सरवदे, लालासाहेब मोरे,गोविंद धावारे,संतोष गायकवाड, समाधान गायकवाड,किशोर राठोड,संतोष शिंदे,रामदास कदम,रामराम यादव,सुरेश वेदपाठक,सुधीर सातापुरे,
ग्रामविकास अधिकारी डी.
आर.कांगणे,जगन्नाथ मोरे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या