विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय लातूर या नावाने पत्रव्यवहार करावा

 विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय लातूर या नावाने पत्रव्यवहार करावा










लातूर,दि.30(जिमाका):-शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय,लातूर या संस्थेचे नामकरण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था लातूर असे करण्यात आले होते.

राष्ट्रीय आयुर्विज्ञाान आयोगाच्या संज्ञेनुसार वैद्यकीय महाविद्यालय संबोधन अत्यावश्यक असल्यामुळे व भविष्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखाली सर्व संस्थाच्या नावामध्ये एकसूत्रिपणा येण्याकरीता शासन निर्णयाअन्वये विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेचे पुढीलप्रमाणे नामकरण करण्यात आले आहे.

यामध्ये विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्याालय,लातूर,विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय,लातूर,विलाराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालय,लातूर व विलासराव देशमुख शासकीय परिचार्य महाविद्याालय,लातूर या नावाचा समावेश आहे.या कार्यालयास पत्रव्यवहार करताना वरिलप्रमाणे करण्यात यावा,असे अधिष्ठाता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय लातूर यांनी पसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या