मराठा भवन निर्मितीसाठी नगराध्यक्षांची भूमिका न्यायाची -रामभाऊ जोगदंड

 मराठा भवन निर्मितीसाठी नगराध्यक्षांची भूमिका न्यायाची -रामभाऊ जोगदंड 




औसा प्रतिनिधी औसा शहरात छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या नावाने मराठा भवन उभारणीसाठी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी घेतलेली भूमिका सामाजिक न्यायाची आहे असे प्रतिपादन रामभाऊ जोगदंड यांनी केले आमच्या प्रतिनिधीशी वार्तालाप करताना ते बोलत होते. पुढे बोलताना रामभाऊ जोगदंड म्हणाले यापूर्वी माजी आमदार बसवराज पाटील यांनी लामजना येथे छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारून शिवरायांची अस्मिता जपली. आता नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या प्रयत्नातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औसा येथील प्रस्तावित मराठा भवन साठी 51 लाख रुपये खर्चाच्या निधीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नगराध्यक्ष औसा शहरात सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करीत असून भरत सूर्यवंशी यांना प्रभारी नगराध्यक्ष पदावर सहा महिने काम करण्याची संधी त्यांनी दिली. शहरातील विविध जातीच्या होतकरू कार्यकर्त्यांना नगराध्यक्षांनी स्वीकृत सदस्य, उपनगराध्यक्ष, प्रभारी नगराध्यक्ष ,पदावर विराजमान करून अनेकांना शहर विकासासाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. नगराध्यक्ष आज ही औसा  शहरात विकासाच्या नवीन योजना राबवित आहेत. शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी गाव तलावाचे संवर्धन, व्यापारी संकुल, सांस्कृतिक सभागृहाचे मजबुतीकरण शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे अशा योजना राबवित आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांची भूमिका सामाजिक न्यायाची असल्याने मराठा समाजाबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करून मराठा भवन उभारणीसाठी प्रयत्न करीत असल्याने रामभाऊ जोगदंड यांनी नगराध्यक्ष यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या