बकरी ईद सणानिमित्त गर्दी टाळण्या साठी नियमनात्मक आदेश*

 *बकरी ईद सणानिमित्त गर्दी टाळण्या साठी नियमनात्मक आदेश*




दि. 16 - उस्मानाबाद -


 *नियमनात्मक आदेश मोडल्यास शिक्षा* 


 *सक्षम अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३३. ३४. ३७ ते ४१ या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमनात्मक आदेशांच्या अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे आवश्यक आहे.*


*जो कोणी नियमनात्मक आदेशांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करेल तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३४ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.* 


उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक २१ जुलै रोजी साजरा होणारा बकरी ईद हा सण शांततेत पार पडावा यासाठी सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांना २० जुलै रात्री १२ ते २३ जुलै रात्री १२ या वेळेत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.


रस्त्यावरील किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी, याविषयी निर्देश देणे, २ अशा मिरवणुकांचे मार्ग विहित करणे.  सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी प्रार्थनेच्या वेळी व कोणत्याही  रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागी 1 किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी, गर्दी होणार असेल किंवा  अडथळा निर्माण होण्याची शक्यता असेल, अशा सर्व ठिकाणी अडथळा होऊ न देणे, ही जबाबदारी या अधिकाऱ्यांनी पार पाडावयाची आहे.


सर्व रस्त्यावरील नद्यांच्या घाटांवर सार्वजनिक ठिकाणी, स्नानाच्या, कपडे धुण्याच्या ठिकाणी जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, कोणत्याह रस्त्यावर सड़केजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविणे, कर्कश वाद्य वाजविणे यावर नियमन करणे किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी करावयाचे आहे.



*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद ** प्रतिनिधी **सय्यद महेबुब **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या