समदर्गा एक महिन्यापासून अंधारात ग्रामस्थांचा निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा

 समदर्गा एक महिन्यापासून अंधारात

ग्रामस्थांचा निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा











औसा तालुक्यातील समदर्गा गावातील ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यामुळे गेल्या 27 दिवसापासून संपूर्ण गाव अंधारात आहे. 

गेल्या एक महिन्यापासून गावात लाईट नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड देत सामोरे जावे लागत आहे. 

एक महिन्यापासून लाईट नसल्याने शेजारच्या गावातून  दळून तसेच पिण्याचे पाणी आणण्याची वेळ समदरगे करांवर आली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने अंधारात घरात साप विंचू निघत आहेत. घरात अंधार असल्याने दिवा लावण्यासाठी रॅकेलही उपलब्ध नसल्याने गोडेतेल वापरून दिवा लावण्याची वेळ आली आहे.

लाईनमन गावात 15-15 दिवस येत नसल्याने गावात अडचणी वाढत आहेत. त्यामुळे लाईनमन  बदलून मिळावे. 

गावातील विद्युतपुरवठा केबलद्वारे करण्यात यावा.

गावातील लाईटचे पोल वाकलेले ते दुरुस्ती करावी काही ठिकाणी नवीन पोल बसवावेत. 

सुग्रीव कसबे यांच्या घरावरून लाईटची गेलेली तार बाजूने घ्यावे.

संपूर्ण गावातील लाईट दोन दिवसात चालू करावी अन्यथा 23 जुलै पासून आपल्या कार्यालया समोर  बेमुदत उपोषण करणार असल्याचे उपअभियंता यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद आहे. 

निवेदनावर सरपंच उद्धव काळे, उपसरपंच महादेव ढोक, तसेच गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या