संजय सगरे यांनी औसा येथील ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रश्नांकडे आमदार साहेबांचे लक्ष वेधले.

 आमदार अभिमन्यूभाऊ पवार वाढदिवस विशेष

पत्रकारांचा स्नेहमेळाव्यात विविध विषयांवर चर्चा सत्र संपन्न





आमदार असेन तोपर्यंत आपल्या आर्थिक निधीचा वापर ग्रामीण विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ करणारा असे अभिवचन औसा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यूभाऊ पवार यांनी औसा येथे दिले. आमदार पवार दिनांक 30 जून 2021 पासून निवासी आले आहेत. त्यानिमित्ताने विधानसभा क्षेत्रांतर्गत सर्वांगीण विकासासाठी समाजातील पत्रकार, डॉक्टर्स, व्यापारी, वकील मंडळी, प्रगतिशील शेतकरी मान्यवरांशी संवाद साधून यांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. या अंतर्गत औसा आणि निलंगा तालुक्यातील पत्रकारांचा स्नेहमेळावा माननीय आमदार पवार यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. प्रथमता प्रास्ताविक औसा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय सुभाषभाऊ जाधव यांनी केले. प्रथमता त्यांनी माननीय आमदार पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून उपस्थित पत्रकारांचे स्वागत केले. माननीय आमदार पवार मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले  30 जून 2021 पासून  कायमस्वरूपी निवास करण्यासाठी आलो आहोत. आपल्या वाढदिवसानिमित्ताने पत्रकारांनी दिलेल्या शुभेच्छा प्रेमाने भारावून गेलो आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार यांनी चांगल्या कार्याला प्रतिसाद द्यावा चूकत असेल तर दाखवावे. इसाक मुजावर यांची कडब्याची बनीम जळाली होती. तसेच शेतमजूर वीरभद्र हरनाळे याचा अंत झाला. सोयाबीन काढून टाकले. त्यांच्या कुटुंबावर शेत रस्ते अभावी सोयाबीनची बनिम करून ठेवली होती. रस्ता नसल्यामुळे मोठाच प्रश्न होता. रस्त्या अभावी शेतकऱ्यावर येणारे संकट ओळखले आणि त्यांना आपण कोणत्या प्रकारे आधार देऊ शकतो. याबाबत नियोजन करून रस्त्याच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले. या कामामुळे आग्यामोहोळ होतील. अशी भीती काही जणांनी व्यक्त केली होती. सदर भीती निराधार ठरली या कामात 98 टक्के यश मिळाले. शेतकरी आनंदित झाले.  क्षेत्रांत 620 शेत रस्त्यांच कामे पूर्ण झाली आहेत. या कामासाठी निधी कमी पडला तर विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रभााऊ फडणवीस यांची समर्थ साथ आहे. शेतकऱ्यांसाठी मनरेगा अंतर्गत दहा लाख रुपयाची तरतूद आहे. या अंतर्गत सत्तावीस कामे समावेश आहे. यापुढील काळात फळबागासह फुलबाग लागवडीला ही प्रोत्साहन देण्यात येणार आहे. फळबागातून मिळणारे उत्पादन शाश्‍वत आहे. त्याला विमा मिळू शकतोो. असा लाभ होऊ शकतो. आगामी काळात एक हजार पाचशे हेक्टर्स फळबाग लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.पत्रकार बांधवानी आपल्या चांगल्या कामांना प्रतिसाद द्यावा चूक झाली तर दाखवून द्यावी सुधारणेला वाव मिळेल. पत्रकारांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा आणि स्नेहभावाने प्रेमाने आपण भारावून गेल्याचे आमदार पवार यांनी शेवटी सांगितले. याप्रसंगी औसा आणि निलंगा तालुक्यातील उपस्थित विजयकुमार बोरफळे,राजू पाटील, हरिभाऊ सगरेे,  रााम काळगे, महेबुब बक्षी , मोहनराव क्षीरसागर,प्रशांत राठोड, संजय सगरे यां  पत्रकारांनी खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले. तत्कालीन जिल्हाधिकारी एकनाथ डवले साहेब यांच्या कार्यकाळात 68 गाव गाव रस्ते 44 शेत रस्ते मोकळे करण्यात आले. शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात लोकांना गावठाण अंतर्गत जागा देण्यात आल्या. अद्यापही या संदर्भात काही अडचणी असून त्याची सोडवणूक करावी. राजकारणामध्ये विचारधारा असतात. आमदार म्हणून पावर साहेबांचे अभिनंदन करतो. निलंग्याला आमावसेचे ग्रहण लागले आहे. औसा पौर्णिमेच्या चांदण्याने उजळून निघाला आहे. मनरेगा योजना शहरी भागासाठी लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली‌. कासार शिरशी, कासार बालकुंदा कर्नाटकसीमापरिसर आहे. या भागाचे प्रश्न आहेत. माननीय आमदार झाल्या पासून या परिसरात पाचवेळेस भेटी दिल्या. आमच्या समस्या जाणून घेतल्या. याचा मला विशेष आनंद होत आहे. सर्वात शेवटी औसा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष माननीय संजय सगरे यांनी औसा येथील ज्येष्ठ पत्रकारांच्या प्रश्नांकडे आमदार साहेबांचे लक्ष वेधले. अनुक्रमे राजू पाटील, विजयकुमार बोरफळे, विलास  कुलकर्णी  यांचे पत्रकार पत्रकारितेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान राहिलेले आहे. खूप वर्षापासून काम करत आहेत. यांचा अभ्यास आहे परिश्रम घेत आहेत. या तिघांनाही शासनाकडून अधिस्वीकृती पत्रिका नसल्यामुळे शासनाचे आर्थिक लाभ मिळत नाहीत. उदाहरणात सेवा निवृत्ती वेतन मिळत नाही. या बाबीकडे आमदार साहेबांनी शासन दरबारी पाठपुरावा करावा. या तिघांनाही शासनाचे आवश्यकती मदत मिळून द्यावे अशी मागणी केली. श्री संजय  सगरे यांनी यावेळी बोलताना समाजातील विविध प्रश्नांची सोडवणूक पत्रकार करीत असतात. दुसरे त्यांच्या  जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष व्हायला नको. असे असे मत व्यक्त केले. पत्रकारांचा हा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला. या मेळाव्यास भारतीय जनता पार्टीचे युवानेते  संतोष सुभाषआप्पा मुक्ता, गटनेते सुनील अप्पा उटगे प्रा. भीमाशंकर राचट्टे, भिमाशंकर मिटकरी, काकासाहेब मोरे, संजय कुलकर्णी नगरसेवक समीर डेंग यांच्यासह मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.शेवटी सुनील अप्पा उटगे यांनी आभार मानले.

    


                                            विलास कुलकर्णी                                                 ज्येष्ठ पत्रकार औसा

                                             9552197268

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या