ग्रीन लातूर वृक्ष टीम तर्फे आज ईद - उल - अज़हा, बकरी ईद निमित्त इब्राहिमशाह कब्रस्तान परिसरात १०४ मोठी झाडे लावण्यात आली.
कडुनिंब, करंज, कांचन,सप्तपर्णी यांची ८-१० फूट उंच झाडे लावण्यात आली. सर्व झाडांना काठ्या लावण्यात आल्या.
ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या एक कॉलनी कमीत कमी ५० झाडे या उपक्रमानुसार ही वृक्ष लागवड करण्यात आली.
या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे, आपल्या प्रभागात वृक्ष लागवडीकरिता ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांसोबत संपर्क करावे असे आवाहन ग्रीन लातूर वृक्ष टीमचे, मनपा नगरसेवक इम्रान सय्यद यांनी केले आहे.
सातत्याने व अविरतपणे गत ७८१ दिवसांपासून कार्य करत ग्रीन लातूर वृक्ष टीमने जिल्ह्यात ६२५४० झाडांची लागवड करून त्यापेक्षा अधिक झाडांचे संवर्धन केले आहे तसेच शहर सुशोभीकरण व शहर स्वच्छते करिता प्रयत्न करत आहेत.
या उपक्रमाकरिता
जिल्हा नियोजन समितीचे कार्यकारी सदस्य ऍड. समदजी पटेल, रौफ खान , पत्रकार बशीर शेख, मोसिन बाबा,बक्षु भाई, बाबूचाचा शेख, सय्यद पाशा मिया, सदिर शेख , अरफत पटेल, इम्रान शेख, सुलतान शेख, व सर्व मुस्लीम बांधव उपस्थित होते.
यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे
डॉ पवन लड्डा, नगरसेवक इम्रानजी सय्यद, सुलेखा कारेपुरकर, पद्माकर बागल, प्रमोद निपाणीकर, सार्थक शिंदे, आशा अयाचित, कल्पना फरकांडे, प्रसाद श्रीमंगले, दयाराम सुडे, अरविंद फड, मुकेश लाटे,नागसेन कांबळे,कांत साहेब, परम साठे, बालाजी उमरदंड, अनुराधा पुंडकर,
शैलेश सूर्यवंशी यांनी वृक्ष लागवडीसाठी परिश्रम घेतले.
*🌳ग्रीन लातूर वृक्ष टीम🌳*
*एक लोकचळवळ*
स्वच्छ लातूर
सुंदर लातूर
हरित लातूर
GREEN CITY
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.