लातूर येथील विमानतळ मेडीकल इर्मजन्सीसाठी ३ महिन्यात तर प्रवासी वाहतुकीसाठी ६ महिन्यात सज्ज करावे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

 

लातूर येथील विमानतळ मेडीकल इर्मजन्सीसाठी ३ महिन्यात तर 
प्रवासी वाहतुकीसाठी ६ महिन्यात सज्ज करावे
 पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख






लातूर प्रतिनिधी (शुक्रवार दि. ९ जूलै २१)
   लातूर विमानतळावर सुरू असलेली संरक्षण भिंत, हवाई धावपटटी, नाईट लॅडींगची व्यवस्था या संबधीची कामे त्वरीत पूर्ण करून मेडीकल इर्मजन्सीसाठी तीन महीन्यात तर प्रवासी वाहतुकीसाठी हे विमानतळ सहा महिन्यात सज्ज करावे असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
  महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ तसेच रिलायन्स एअरपोर्ट अथोरिटीचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत आज मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे लातूर विमानतळ विकास कामाचा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी आढावा घेतला. यावेळी संरक्षण भिंत बांधकामात आलेल्या अडचणी, जमीन अधिग्रहन त्याच बरोबर धावपट्टीची एकुण लांबी, नाईट लँडिंगसाठी कराव्या लागणाऱ्या व्यवस्था या संबंधाने बैठकीत सविस्तर चर्चा झाली. विमानतळासाठी उपलब्ध असलेल्या जागेचा विचार करून त्याप्रमाणे धावपटटीत थोडा फार फरक करून संरक्षणभिंतीचे राहीलेले काम पूर्ण करावे, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आवश्यकते प्रमाणे जमीनीचे संपादन करावे अशा सुचना पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिल्या. इतर कामे सुरू असतांना नाईट लॅडीगची व्यवस्था उभारावी, सध्याची कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेता येत्या तीन महीन्यात शिल्लक राहीलेले कामे जलद गतीने पूर्ण करून या विमानतळा वरून मेडिकल इमर्जन्सी सेवा सुरू करावी तर प्रवासी वाहतुकीसाठी हे विमानतळ सहा महिन्यात सुसज्ज करावे असे निर्देशही या बैठकी दरम्यान त्यांनी दिले आहेत.
  लातूर विमानतळ विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीत रिलायन्स एअरपोर्ट अथोरिटीचे तारीक भट, एमआयडी भूसंपादन व्यवस्थापक गोपीनाथ ठोंबरे, के एम चाटे , लातूर विभागीय अधिकारी महेश कुमार मेघमाळे, कार्यकारी अभियंता संजय कौसडीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
-------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या