*सोयाबीन पीकविम्याचा परतावा देण्याची मागणी*
दि. - 12 - उस्मानाबाद
तालुक्यातील वांजरवाडा येथील शेतक-यांनीगेल्या वर्षी ऐन काढणीच्यावेळी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे पीकविमा परतावा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील वांजरवाडा येथील वंचित शेतक-यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिका-यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.खरीप हंगामात सोयाबीनचा पीकविमा भरला होता. पीकनिहाय विमा रक्कमेचा हप्ता बँकेत तसेच ऑनलाईनरित्या भरली होती. शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही विमा कंपनीकडून परतावा मंजूरकरण्यात आला नाही.
तालुक्यातील पिकांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी कृषीमंत्री हे वांजरवाडा येथे आले असता सोयाबीनचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे त्यांना दिसून आले होते. त्यामुळे शासकीय नुकसान भरपाईबरोबरच पीकविमा देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले होते. परंतु, अद्याप पीकविमा मिळाला नाही. शासनाने संबंधित विमा कंपनीस विमा परतावा देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी संदीपान आगलावे, सोमनाथ ताकबिडे, गोविंद कदम, नागनाथ टेकाळे, धनंजय आगलावे, संभाजी गोरखे आदींची उपस्थिती होती.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.