औसा तालुक्यातील लातूर ग्रामीणला जोडलेल्या सर्वच गावातील विविध विकास कामेसंदर्भात लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांची भेट व निवेदन
औसा प्रतिनिधी
आज शिवली पंचायत समिती गणासह औसा तालुक्यातील लातूर ग्रामीणला जोडलेल्या सर्वच गावातील विविध विकास कामे व नागरिकांच्या समस्या संदर्भात लातूर ग्रामीणचे आमदार माननीय धीरजभैया देशमुख यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. या भागात गावाला जोडणाऱ्या रस्त्याची चाळण झाली असून वरवडा- भादा,
वडजी -शिवली, शिवली -आंदोरा, जायफळ- शिवली,आंदोरा- भेटा,समदर्गा मोड ते शिवली मोड इत्यादी रस्त्याच्या कामास निधी उपलब्ध करून देऊन सदरील कामे तात्काळ मंजूर करण्यात येऊन सुरू करावीत तसेच शिवली व भेटा येथील 33/11 उपकेंद्रावर जास्त लोड असल्याने नेहमी बिघाड होत असून या दोन्ही ठिकाणी अतिरिक्त 5 mva चा प्रत्येकी एक अतिरिक्त पावर ट्रांसफार्मर त्वरित बसवण्यात यावा जेणेकरुन या भागातील शेतकरी व ग्राहकाची होत असलेली गैरसोय दूर होईल.तसेच मौजे जायफळ येथे मंजूर असलेल्या आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे, व या भागात शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शेत रस्ता व पाणंद रस्त्याच्या करण्यात आलेल्या माती कामाची आमदार निधी अथवा डीपीडीसीच्या निधीच्या माध्यमातून देयके अदा करण्यात यावेत,मौजे शिवली येथील दलित बांधवांसाठी स्मशानभूमीसाठी हक्काची व कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे तसेच मौजे बिरवली येथील रोहिदास नगरला वास्तव्य असलेल्या ग्रामस्थांसाठी ये-जा करण्यासाठी म्हत्वाच्या असलेल्या रस्त्याचे काम मंजूर करून होत असलेली गैरसोय दूर करावी, या भागात प्रत्येक घराला नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा उद्देश असलेल्या केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेचे काम अत्यंत धिम्या गतीने होत असून या कामास गती देऊन काही गावचे आद्यापही अंदाजपत्रक मंजूर झालेले नाहीत ते सादर करण्याच्या सूचना देऊन ती कामे मंजुर करून तात्काळ सुरू करावीत तसेच टाका येथील ग्रामपंचायतीने मागणी केल्याप्रमाणे नरेगाच्या माध्यमातून गावांतर्गत रस्ते मंजूर करून त्यास निधी उपलब्ध करून देण्यासाठी माननीय तहसीलदार औसा यांना आदेश द्यावेत.इत्यादी विकास कामाच्या मागण्यांचे निवेदन या भागातील लोकप्रतिनिधी या नात्याने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज रोजी देण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.