ॲड.एस.एस. पाटील स्मृतीदिनी ८९ जणांचे रक्तदान

 ॲड.एस.एस. पाटील स्मृतीदिनी ८९ जणांचे रक्तदान

आलमला / प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲड. एस. एस. पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आलमला ग्रामस्थ, लातूर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आलमला येथे रविवारी झालेल्या शिबिरात ८९ जणांनी रक्तदान केले.

ॲड. एस. एस. पाटील समाधीस्थळी शिबिराचे उद्घाटन औशाचे पोलीस निरीक्षक एस. यु. पटवारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 'पुण्यनगरी'चे वृत्तसंपादक महादेव कुंभार तर प्रमुख पाहुणे म्हणून ब्लड बँकेचे डॉ. अमोल जगताप उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष नरेेंद्ग पाटील, ॲड. उमेश एस. पाटील, रमाकांत निलंगेकर, आलमला सोसायटीचे व्हा. चेअरमन अहमद तांबोळी, सरपंच कैलास निलंगेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास सोसायटी चेअरमन विश्वनाथ बिराजदार, पोलीस पाटील सुरेंद्ग पाटील, प्रभाकर कापसे, शिवाजी कुंभार, विरनाथ अंबुलगे, बसवेश्वर खराबे, ओमप्रकाश धाराशिवे, रंगनाथ निलंगेकर, केदार निलंगेकर, महादेव जगदाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरासाठी आलमला ग्रामस्थ, सिध्देश्वर बँकेचे कर्मचारी, रामनाथ विद्यालयाचे सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

....................फोटो.............



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या