राजमाता जिजामाता बी. एड.
महाविद्यालयाचे परीक्षेत उज्ज्वल यश
महाविद्यालयाचे परीक्षेत उज्ज्वल यश
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या बी. एड. परीक्षेचा निकाल आज दि. २१ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत येथील राजमाता जिजामाता अध्यापक (बी. एड.) महाविद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले असून या महाविद्यालयाचा या परीक्षेचा ९४ टक्के निकाल लागला आहे.
या परीक्षेत या महाविद्यालयातील स्नेहा संजयसिंग चंदेले हिने ८३ टक्के गुण मिळवत प्रथम, अंजली बाळासाहेब जाधव हिने ८२.३६ टक्के गुण मिळवत द्वितीय तर भाग्यश्री शंकर वसमतकर हिने ८२.२४ टक्के गुण घेवून या महाविद्यालयात तृतीय येण्याचा मान पटकावला. या महाविद्यालयातील ६७ विद्यार्थीr ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेवून विशेष प्राविण्यात उत्तीर्ण झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्षा के. ए. जायेभाये, सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, प्रा. अरुण करदुरे, प्रा. राजेंद्र जायेभाये, डॉ. जोत्सना गव्हाणे, प्रा. कविता केंद्रे, प्रा. अश्विनी केंद्रे, संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, शिवकुमार चिकले आदींनी कौतुक केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.