ज्येष्ठनागरिक संघ व मारुती फाउंडेशनच्यावतीने ७५ माहिला व पुरूष ज्येष्ठनागरिकांचा तसेच डाँक्टर, सिस्टर, अंगनवाडी सेवीका व आशाताई यांचा कोवीड योध्दा पुरस्काराने सन्मान

 वाई, दि. २० : ज्येष्ठांकडून मिळालेली कामाची पोहचपावती सर्वाधीक प्रिय असते. कोरोना महामारीत ज्यांनी खर्‍या अर्थाने गावाची सेवा केली त्या डाँक्टर, सिस्टर, अंगनवाडी सेवीका व आशाताई यांचा सन्मान करुन ज्येष्ठ नागरिक संघ पसरणी व मारुती फाउंडेशनने आपुलकी जपली आहे, असे उद्गार पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के यांनी काढले.





    पसरणी (ता. वाई) येथे रौप्यमहोस्तवी वर्षा निमित्त ज्येष्ठनागरिक संघ व मारुती फाउंडेशनच्यावतीने ७५ माहिला व पुरूष ज्येष्ठनागरिकांचा तसेच डाँक्टर, सिस्टर, अंगनवाडी सेवीका व आशाताई यांचा सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देवुन कोवीड योध्दा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिर्के बोलत होते.

     यावेळी सरपंच सौ. हेमलता गायकवाड, उपसरपंच सुनील महांगडे, डाँ. सुरज महांगडे, डाँ. सौ. प्रज्ञा गायकवाड, योगेश पाटिल, सुनील फरांदे, ईश्वरी बनकर, सौ. फरांदे, सौ. पिंगळे, बाळासाहेब शिर्के, अरुण शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

   य‍ावेळी मान्यवर‍ांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देवुन सन्मान करन्यात आला. तसेच डाँ. सुरज महांगडे, डाँ. प्रज्ञा गायकवाड, पसरणी ग्रामीन रुग्नालयातील सिस्टर, आशा सेवीका, अंगणवाडी सेवीका, पत्रकार अमोल महांगडे यांना कोरोना योध्दा पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले.

     बाळासाहेब शिर्के म्हणाले, गेली २१ वर्षे गावासह जिल्हयातील गरजू विद्यार्थ्यांना मारुती फाउंडेशन मदतीचा हात देत आहे. ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून गावासाठी चांगले कार्य करणार्‍यांचा सन्मान करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून गावातील डाँक्टरांनी ग्रामस्थांचे प्राण वाचवीले आहेत. यात ते स्वत: बाधित झाले तरिही त्यांनी बरे होवुन रुग्नसेवा सुरू केली. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हा आम्हा ज्येष्ठांसाठी आनंददाई क्षण आहे.

    प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कै. शंकरराव महांगडे, जगन्नाथ जमदाडे, सहाव्या स्मृतीदिना निमित्त कै. सौ. वंदना शिर्के  यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. श्रीगणेश शेंडे यांनी सुत्रसंचालन केले. बाजीराव शिर्के, बाबुराव येवले, विठ्ठल महांगडे, रामभाऊ येवले, अंकुश वरे यांनी स्वागत केले. महादेव महांगडे यांनी आभार मानले. 

    कार्यक्रमास रविराज गाढवे, रामभाऊ शिर्के, आनंदराव पाटिल, विक्रम चव्हाण, बाळासाहेब शिर्के, सर्जेराव येवले, वत्सला गायकवाड, सौ. स्मिता पाणसे, सौ. उमा दिक्षीत यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या