शेतकऱ्यांच्या हितासाठी " गतिमान, ' शासन - प्रशासन '... खासदार व आमदारांच्या उपस्थिती ; निम्न तेरणा प्रकल्पातून सोडले पाणी...

 " शेतकऱ्यांच्या हितासाठी " गतिमान, ' शासन - प्रशासन '... 

खासदार व आमदारांच्या उपस्थिती  ; निम्न तेरणा प्रकल्पातून सोडले पाणी... 






एस ए काझी 







औसा /प्रतिनिधी : - लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पावसाने उघड दिल्याने सोयाबीन व खरीप पिकांवर संकट ओढवले होते, हाताशी आलेले पीक वाया जातोय की काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. या परिस्थितीचा आढावा घेऊन उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले,  व औशाचे आमदार  अभिमन्यू पवार या  लोकप्रतिनिधींनी अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास, प्राधिकरण लातूर यांना निम्न तेरणा प्रकल्पातून डावा व उजवा कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी दि. 11/08/ 2021 ते 13/08/2021 च्या दरम्यान केली होती. तसेच  वैद्यकीय शिक्षण व संस्कृती कार्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई  तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनाही याबाबतीत कळविले होते. तेही कालवा-सल्‍लागार समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची व लोकप्रतिनिधी यांची आग्रही मागणी तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पीक परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दि. 14 /08/ 2021 रोजी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.

त्यानुसार अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग अधिकारी, अभिजीत म्हेत्रे प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, लातूर व कार्यकारी अभियंता रोहित जगताप, लघु पाटबंधारे विभाग क्रमांक 1 लातूर  यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ पाणी सोडण्याचे नियोजन केले. दि. 15/08/ 2021 रोजी दुपारी 12 : 30 वाजता निम्न तेरणा प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून जलपूजन करून पाणी सोडण्यात आले. यावेळी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, औशाचे आमदार अभिमन्यू पवार, अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, लातूर अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित जगताप, उपविभागीय अधिकारी एन बी पाटील, शाखा अभियंता के आर येणगे, निम्न तेरणा प्रकल्प धरण शाखेचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. 

शासनाने - प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ पाणी सोडण्याची कार्यवाही केल्यामुळे निम्न तेरणा जलाशय डावा व उजवा कालव्यावर सुमारे 2500 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळणार आहे त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या