त्यागातून मिळवलेले स्वातंत्र्य टिकवणे ही सर्वाचंी जबाबदारीःऍड.सुधाकर आरसुडे

 

त्यागातून मिळवलेले स्वातंत्र्य टिकवणे ही सर्वाचंी जबाबदारीःऍड.सुधाकर आरसुडे












लातूर, दि.१६ः राष्ट्रपिता महात्मा यांच्या सारख्या अनेक  शूरांंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदान दिले याची जाणीव ठेवून,त्यागातून मिळवलेेले हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे,असे मत ऍड.सुधाकर अरसुडे यांनी येथे व्यक्त केले.
सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालयाच्या स्वातंत्र्य सैनिक नगरातील विस्तारीत वाचनकक्ष- अभ्यासिकेत रविवार,दि.१५ऑगस्ट २०२१ रोजी ७५ व्या स्वातंत्र्य वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरुन ते बोलत हेाते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र  आर्यन सेनेचे संस्थापक अध्यक्ष अविरांजे निंबाळकर व मंगल बारसकर या होत्या.मंचावर ग्रंथपाल अंजुषा काटे,सामाजिक कार्यकर्ते बुध्दभूषण  बनसोडे हे होते.
पावणे दोनशे देशावर राज्य असलेल्या इंग्रजाशी सहिष्णुतेच्या, अहिंसेच्या मार्गाने लढा उभारुन महात्मा गांधी यांनी प्रसंगी स्वतःचे बलिदान देवून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.माणसाने कृतीबरोबरच उक्ती करावी,माणसाचे कार्यच अजरामर राहते हे आपल्या महापुरुषाच्या कार्यावरुन लक्षात येते. सकारात्मक राहिल्यास सकारात्मक कार्य होते,असे सांगून सार्वजनिक ग्रंथालयांनी ज्ञानाची पणती तेवत ठेवली आहे,त्यात मदतरुपी तेल घालणे ही समाजाची जबाबदारी आहे असे ऍड.आरसुडे यांनी सांगितले.
तर ग्रंथालयाच्या माध्यमातून समाजाला  दिले जाणारे ज्ञान अत्यंत मोलाचे आहे,त्यासाठी आपल्या परिने ग्रंथालयास आपण मदत करु असा शब्द देवून अविराजे निंबाळकर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.मंगल बारसकर, अंजुषा काटे यांनीही विचार मांडले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदशर्र्न सचिव बी.जी.होळीकर यांनी केले.यावेळी संकेत होळीकर, नितीन चालक, विष्णु पेठेकर आदी उपस्थित होतेे.यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला वाहून  अभिवादन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या