अहमदपूरच्या भक्तीस्थळ परिसरातील गैरव्यवहारांची चौकशी करा विविध संघटनांचे लातुरात लाक्षणिक उपोषण

 

अहमदपूरच्या भक्तीस्थळ परिसरातील गैरव्यवहारांची चौकशी करा 

विविध संघटनांचे लातुरात लाक्षणिक उपोषण











लातूर/प्रतिनिधी :वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची समाधी असणाऱ्या भक्तीस्थळ परिसरात अनेक गैरव्यवहार होत आहेत.या गैरव्यवहारांची चौकशी करावी या मागणीसाठी शिवा लिंगायत युवक संघटना, अखिल भारतीय वीरशैव महासभा,लातूर,अनुभव मंटप व बसव सेना यांच्या वतीने शुक्रवारी (दि.६ )लातूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
   डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करावी.शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊनही काही लोक समाधी खोदण्याचा प्रयत्न करत आहेत,त्यास प्रतिबंध करावा.समाधीस पोलीस संरक्षण मिळावे.डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची आयुष्याच्या शेवटच्या काळात कॅमेऱ्यासमोर बोललेली सीडी सार्वजनिक करावी.भक्तीस्थळ परिसरातील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.वीरमठ राजुर, संस्थानला भक्तांनी दिलेली जमीन वैयक्तिक नावावर करून विक्री केलेल्या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही व्हावी.निलंगा मठाच्या जमिनीवरील सर्व अतिक्रमणे काढावीत.औसा मठाची २५ एकर जागा खाजगी व्यक्तींना विक्री केली असून त्याची चौकशी करावी, आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले.
 यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.शिवा संघटनेचे दयानंद पाटील, अखिल भारतीय वीरशैव महासभेचे शिवराजअप्पा शेटकार,मल्लिकार्जुन कानडे, शिवाजीअप्पा भांजी,
सौ.उमादेवी चोळखणे यांच्या या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.
  शीलाताई माळोदे,लताताई मुद्दे,पद्मिनी मुनाळे,पूनम स्वामी,सविता गंगापूरे,सौ. मंगल मानके,सौ.पुष्पाबाई मुळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.

--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या