लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
लातूर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेल व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने
औसा प्रतिनिधी दि. 16
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ९ व्या स्मृती दिनानिमित्त हिप्परगा ता औसा येथे लातूर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेल व लायन्स क्लब लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ऑगस्ट रोजी सोमवार सकाळी 11 वाजता हिप्परगा येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचा लाभ गावातील व परिसरातील जेष्ठ वयोवृद्ध नागरिक, महिला यांनी घ्यावा असे आवाहन हिप्परगा चे भुमिपुत्र तथा महाराष्ट्र राज्य ओबीसी सेल चे सदस्य प्रा सुधीर पोतदार यांनी केले होते.
या मोफत नेत्र तपासणी शिबीरामध्ये 147लोकांची नोंदणी करुन तपासणी करण्यात आली.या तपासणीत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी 25 लोकांची तपासणी करण्यात आली.
या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन गावचे जेष्ठ नागरिक व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावचे सरपंच इंद्रजित घोडके यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून प्रा एकनाथ पाटील लातूर जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, विलासराव देशमुख युवा मंच अध्यक्ष रवी पाटील, सदाशिव काळे,औसा माध्यम मिडीया प्रमुख विठ्ठल पांचाळ , मातोळा सरपंच बालाजी सुर्यवंशी, चंद्रशेखर भोसले, शेषेराव गायकवाड आदी उपस्थित होते तर लायन्स क्लबचे सुधाकर जोशी,पी विवेकानंद,गोरे मॅडम, अशोक पांचाळ यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होते.हे शिबीर यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी प्रा सुधीर पोतदार सर, गावचे सरपंच घोडके, उपसरपंच काटे, दत्ता नन्नवरे, सोपान जगताप, विशाल कोळी,गुंडू गिरी, महादेव पाटील,अपासाहेब जगताप आदींनी परिश्रम घेतले
या शिबिरात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात हिप्परगा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून तपासणी करून घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सुधीर पोतदार सर यांनी केले तर आभार दत्ता नन्नवरे यांनी मांडले









0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.