औसा उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्यमंत्र्यांचा हिरवा कंदील भाजपा काँग्रेस मध्ये श्रेय घेण्यासाठी चढाओढ
औसा - प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वीच आ. अभिमन्यू पवार यांनी औसा येथे आरोग्य सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी यांच्या बरोबर बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान औसा शहरात व तालुक्यात वैधकिय सेवेत काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. याचबरोबर कोव्हीडच्या पाश्र्वभूमीवर या आरोग्य सेवेत काय बदल आवश्यक आहेत या अनुषंगाने या बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून झालेल्या चर्चेत औसा येथे उपजिल्हा रुग्णालयाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले होते.यानुसार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे दि.५ आॅगस्ट रोजी मुंबई भेटी दरम्यान आ. अभिमन्यू पवार यांनी औशाला उपजिल्हा रुग्णालयाची पहिली मागणीला हिरवा कंदील दाखवत तात्काळ मंजुरीचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथे आ. अभिमन्यू पवार यांनी भेट घेतली. औसा शहराची वाढलेली लोकसंख्या व इतर बाबी विचारात घेता औसा ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय म्हणून दर्जोन्नत व्हावे यासाठी आ. अभिमन्यू पवार हे प्रयत्न करीत होते.या भेटीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली आरोग्यमंत्र्यांनी औसा ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय म्हणून दर्जोन्नत करण्यास मान्यता दिली असून तशा सूचनाही आरोग्य प्रशासनाला दिल्या आहेत. औसा मतदारसंघातील आरोग्य सुविधा विकसित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण आहे.दरम्यान या भेटीत औसा ग्रामीण रुग्णालय येथे ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्यात यावे, औसा ग्रामीण रुग्णालयासाठी अद्ययावत कार्डियाक ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात यावी, औसा शहरात व ग्रामीण भागात मोबाईल मेडिकल लॅब उपलब्ध करून देण्यात यावी, शासकीय व खाजगी डॉक्टर्ससाठी औसा येथे डॉक्टर भवन उभारण्यात यावे तसेच लातूर व धाराशिव जिल्ह्यांसाठी असलेल्या बायोमेडिकल वेट्स कार्यालयाचे विकेंद्रीकरण करून तालुकास्तरावर बायोमेडिकल वेट्स गोळा करणाऱ्या संस्था उभारण्यात याव्यात अशा मागण्याही आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. या मागण्यांबाबत आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याविषयी आश्वासित केले आहे.
औसा विधानसभा मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार हे सातत्याने प्रयत्न करीत असतात त्याचाच एक भाग म्हणून औसा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या मागणीला यश आले असून या अनुषंगाने नागरिकांना येणाऱ्या काळात अत्यावश्यक व दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल.
औश्यात सोशल मिडीया मधून हे काम आमच्यामुळेच झाले असा दावा भाजपा व काँग्रेस पक्ष्यांच्या कार्यकर्त्यामधून होत आहे. कुणामुळे का होईना पण औश्यात उपजिल्हारुग्णालय व्हावे व तालुक्यातील जनतेला आरोग्य सेवा वेळेवर मिळावी हिच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.
औश्यात पालकमंञी मा ना अमितभैय्या देशमुख यांच्या आढावा बैठकीत काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्रीशैलदादा उटगे यांनी औसा येथे उपजिल्हा रुगणालय बाबत लेखी मागणी पालकमंञी यांच्याकडे कली होती व त्या वेळेस पालकमंञी यांनी अधिकारी यांना तत्काळ प्रस्ताव पाठविन्याची सुचना केली होती. व पुढे स्वतः पालकमंञी यांनी आरोग्य मंञी यांच्याकडे शिफारस केली होती. मग हे कोणाच्या पाठपुराव्या मुळे झाले.आपणच सांगा असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यामधून विचारला जात आहे.



0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.