*पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण व इंडियन मेडिकल असोसिएशन, लातूर (IMA) यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस अधिकारी/अमलदार, होमगार्ड व पोलीस पाटील यांचे कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.145 लोकांची तपासणी*
या बाबत थोडक्यात माहिती अशी की,आज दिनांक 17/09/2021 रोजी सकाळी पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांचे संकल्पनेतून "मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन" चे औचित्य साधून लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच होमगार्ड व पोलीस पाटील यांचेसाठी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय करिता आरोग्य तपासणी शिबिर चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर ग्रामीण) श्रीमती प्रिया पाटील मॅडम हे होते. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन चे शिबिरामध्ये भाग घेतलेले व कार्यक्रमाचे ठिकाणी उपस्थित असलेले श्रीमती डॉ. सुरेखा काळे मॅडम (अध्यक्ष आय.एम.ए.)
सचिव डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. शीतल पाटील (हृदयरोग तज्ञ), डॉ. सुदर्शन गुंटे (हृदयरोग तज्ञ), डॉ. पद्मसिंह बिराजदार (बालरोग तज्ञ), डॉ. क्रांती साबदे (नेत्ररोग तज्ञ), डॉ.ऋषिकेश नलावडे (अस्थिरोग तज्ञ) डॉ. प्रियांका ढवळे (त्वचारोग तज्ञ) डॉ. राम जोशी (त्वचारोग तज्ञ) डॉ. किरण कराळे (प्राथमिक आरोग्य केंद्र,बोरी) यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांचे व उपस्थित सर्व डॉक्टर यांचे हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांचे प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलित करून आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमांमध्ये पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे यांनी त्यांचे अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी सांगितले की,मनुष्याच्या आयुष्यात अडचणी याव्यात म्हणजे जेव्हा अडचणी येतात तेव्हा त्यातून काहीतरी मोठं निर्माण होतात. इंग्रज आले नसते तर भारत स्वतंत्र झाला नसता. अडचण आली, त्याची जाणीव निर्माण झाली आणि त्याच जाणिवेतून जे कष्ट घेण्यात आले त्याच्यावर भारताला स्वातंत्र्य मिळाल. भारत स्वतंत्र झाला त्याच्या नंतर पुढची अडचण आली की, 552 पेक्षाही जास्त संस्थानं या देशांमध्ये अस्तित्वात होती. त्या सगळ्यांना एकत्र करून सर्व लोकांना भारत या देशाच्या एका छत्राखाली आणणे ही मोठी पुढची अडचण निर्माण झाली. आणि त्याच्यावर ती देखील तोडगे काढायचे प्रयत्न झाले. 03 संस्थान वगळता इतर सर्व संस्थांनाचं भारत देशामध्ये विलिनीकरण करण्यात आलं आणि त्यातूनच पुढची अडचण होती ती म्हणजे या 3 संस्थानानांचा काय? त्यानंतर नंतर त्या अडचणीतून निर्माण झाला तो म्हणजे "हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा" आणि आजचा दिवस त्यामुळे महत्त्वाचा आहे.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन म्हणून आज आपण हा दिवस साजरा करत आहोत म्हणून परंतु देखील मला एक गोष्ट सांगायची इच्छा या ठिकाणी होते आणि ती म्हणजे, अजून लढा संपलेला नाही. काल परवा पर्यंत आपण आपल्या स्वतःच्या प्रकृतीकडे आरोग्याकडे आणि आपल्या वैद्यकीय क्षेत्राकडे दुर्लक्ष करत होतो. पण आजच्या covid-19 च्या परिस्थितीमध्ये आपले आरोग्याकडे, वैद्यकीय क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपणास पूर्ण ताकदीने आजच्या परिस्थितीचा सामना करायचा आहे, लढा द्यायचा आहे.
डॉक्टर हे सुद्धा आपलेच भाऊबंद आहेत आपल्यातलेच आहेत. ते शरीराच्या आजाराचे निदान करतात आणि पोलीस हा समाजाचा डॉक्टर असतो कुठेतरी दगडफेक झाली, कुठेतरी जातिवाद, धार्मिक तेढ निर्माण झालेल्या समाजाला आजार जडला त्या आजाराचे निदान करायचं आणि त्याचा उपचार पोलिसच करतो. चांगला आरोग्यपूर्ण समाज निर्माण करण्याची गरज या गेल्या दोन वर्षांमध्ये आपल्याला जाणवू लागले आणि हा देखील एक क्रांतीच विषय आहे. हा देखील एका बदलाचा विषय आहे. आणि त्याकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. आता कुठे आपल्यामध्ये त्या गोष्टीची जाणीव निर्माण व्हायला लागली आहे. ही जाणीव टिकून ठेवणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने आज आपण इथे हैदराबाद मुक्तिसंग्राम साजरा करतोय त्याच प्रमाणे कदाचित आपण *"चांगलं आरोग्य मुक्तीदिन"* असा एखादा भविष्यामध्ये कदाचित साजरा करूयात. पण त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन कष्ट घ्यायला लागणार आहे.
मला सांगायला आवडेल की, लातूरची संस्कृती आहे ती संस्कृती निर्माण करण्यामध्ये डॉक्टर , टीचर्स आणि प्रोफेशनल्स व व्यापारी या चार घटकांनी या जिल्ह्याची या शहराची संस्कृती निर्माण केली आहे.आणि त्यामुळे हा जिल्हा सगळ्यात चांगला जिल्हा म्हणून गणला जातो. लातूरची ओळख एक सुसंस्कृत चांगला जिल्हा म्हणून आहे.
उदगीरला गणेश विसर्जना बाबत आम्ही केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनास 100% सहकार्य करण्यात आलं हे फक्त आपल्या सुसंस्कृत जिल्ह्यातच शक्य होतं.
लातूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपली लोकांमधली प्रतिमा आहे. ती आणखीन चांगली कशी करतात त्यांच्यासाठी काम करावे.ज्या पद्धतीने आज लातूर जिल्हा मराठवाड्यामध्ये एक चांगला वैद्यकीय दृष्ट्या प्रगत असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याच पद्धतीने एक चांगला पोलीस शासन असणारा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करायची असेल तर त्यासाठी सगळ्या 1856 पोलीस अंमलदारांनी कष्ट घेणे आवश्यक आहे आहे असे विचार मांडले.
तसेच पोलीस स्टेशनचे दैनंदिन काम करत असताना दोन महत्त्वाच्या गुन्ह्याचा अतिशय उत्कृष्टपणे तपास गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल जप्त केल्याप्रकरणी पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व अमलदार यांचे प्रशस्तीपत्र, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक व्यंकट पडीले, पोलीस उपनिरीक्षक माधव लोणीकर, सपोउपनी नागनाथ पांढरे, पोलीस अमलदार राहुल दरोडे, सतीश लामतुरे, संतोष थोरात, संतोष हजारे, विनोद लखनगिरे, गजानंद टारपे, सायबर पोलिस स्टेशनचे प्रदीप स्वामी यांचा समावेश होता.
आरोग्य शिबिर कार्यक्रमाची प्रस्तावना उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर ग्रामीण) प्रिया पाटील मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक श्री. गणेश कदम यांनी मांडले.
सदर आरोग्य शिबिर मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार,होमगार्ड व पोलीस पाटील यांची व त्यांच्या कुटुंबीय अशी एकूण 145 जणांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.